पुणे: Dr Ajay Taware – Dr Shrihari Halnor Arrest | पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणात (Kalyani Nagar Accident) आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. ससूनच्या डॉक्टरांनी (Sassoon Hospital) अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याच्या आरोपात दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. (Porsche Car Accident Pune)
पुणे शहर गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) आज ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघा डॉक्टरांना कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात (Blood Sample Collection) फेरफार केल्याप्रकरणी अटक केली.
या डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने घेतले आणि ते कचऱ्यात टाकले, त्यानंतर त्यांनी तिसऱ्या व्यक्तीचे नमुने अल्पवयीन आरोपीचे असल्याचे भासवत अहवाल दिला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
याविषयी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण माहिती दिली. याबाबत माध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ” कुठलीही शंका राहू नये, म्हणून रात्री अल्पवयीन आरोपीचा दुसरा ब्लड सँपल औंध येथील रुग्णालयात घेण्यात आले होते . ससूनमध्ये जे ब्लड सँपल गेले ते आरोपीचेच आहे की नाही हे तपासण्यासाठी हे दुसरे सँपल घेण्यात आले होते.
काल आम्हाला जे रिपोर्ट प्राप्त झाले, त्यानुसार, औंधला (Aundh Hospital) दिलेले सँपल हे आरोपीचे होते , ते त्याच्या वडिलांच्या ब्लड सँपलशी मॅच झाले . पण, ससून चे सँपल हे अल्पवयीन मुलाचे नव्हते, हे स्पष्ट झाले . त्यानंतर डॉक्टरांना ताब्यात घेऊन चौकशी केली मग त्यांना आज सकाळी अटक करण्यात आली.” यासाठी त्यांनी तीन लाख रुपयांची लाच घेतल्याची माहिती पोलिसांकडून (Pune Police) देण्यात आली.