Warje Malwadi Pune Accident News | पुणे : तलाठी होण्याचे स्वप्न राहूनच गेलं, परिक्षेला जाणाऱ्या तरुणीचा अपघाती मृत्यू; मुंबई-बंगळुर महामार्गावरील घटना

Accident
June 20, 2024

पुणे :  – Warje Malwadi Pune Accident News | तलाठी होण्याचे स्वप्न बाळगून तलाठी पदाची परीक्षा देण्यासाठी शिवणेतील (Shivane) एका विद्यालयात जात असताना तरुणीच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. या अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात वारजे माळवाडी लगत असलेल्या मुंबई-बंगळुर महामार्गावरील (Mumbai Bangalore Highway) हिंदुस्थान पेट्रोलियम पंपासमोर पहाटे साडेपाच वाजता झाला. भरधाव टेम्पो ट्रॅव्हल्सच्या धडकेत जयश्री वसंता जाधव (वय-24 रा. जोडगाव, ता. मालेगाव जि. वाशिम) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.

हा अपघात एवढा भयानक होता की, रस्त्यावर मांस विखुरले होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. जयश्री तिचे वडील आणि भाऊ हे एकाच दुचाकीवरून जात होते. शिवणेतील एका कॉलेजवर जयश्री तलाठी पदाची परीक्षा देण्यासाठी जात होती. त्यावेळी झालेल्या भीषण अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

वारजे पोलिसांकडून (Warje Malwadi Police Station) मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे एका खड्यात त्यांची दुचाकी आदळली. जयश्री तिघांत सर्वात मागे बसली होती. दुचाकी खड्यात आदळल्याने जयश्री रस्त्याच्या उजव्या बाजूला पडली. त्याचवेळी भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलने जयश्रीला जोरात धडक दिली. यात गंभीर जखमी होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.