मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) ही शेवटची निवडणूक (Election) असेही ते म्हणाले होते. तुम्ही 2019 ला माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. तिघांनी मिळून एकत्रितपणे अडीच वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला. पण संपवू शकला नाहीत आणि यापुढेही संपवू शकणार नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena chief Uddhav Thackeray) यांनी बुधवारी शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) आणि भाजपावर (BJP) जोरदार निशाणा साधला. या टीकेला फडणवीस यांनी उत्तर दिले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, कालचे भाषण म्हणजे निराशेचे अरण्यरुदन होते. आम्ही तर कायदेशीररित्या निवडून आलो आहोत. मात्र ज्यावेळी आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठीत खंजीर खुपसला तेव्हा का राजीनामे दिले नाहीत किंवा का निवडणुका घेतल्या नाहीत, असा माझा सवाल आहे. काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) सोबत निवडून आला नव्हतात.
फडणवीस पुढे म्हणाले, आमच्यासोबत निवडून आला होतात. मोदींचा फोटो लावून निवडून आला होतात. हिंमत होती तर त्यावेळी निवडून आला असता आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचे होते. कालचे भाषण हे निराशेचे भाषण होते.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे…
– हिंमत असेल, तर पुढच्या महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक (Mumbai Municipal Election) घ्या
आणि आणखीच हिंमत असेल, तर त्या सोबतच विधानसभेची निवडणूक (Assembly Election) घेऊन दाखवा.
– महापालिका निवडणूक (Municipal Election) आली की, या गिधाडांना मुंबई दिसते, कारण ती त्यांच्यासाठी स्क्वेअर फुटाने विकण्याची जागा आहे.
आमच्यासाठी ती 105 वीरांच्या बलिदानातून मिळविलेली मातृभूमी आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
– मुंबई आमची आई आहे आणि या आईवर वार करायला आलेल्यांचा कोथळा आम्ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.
– या कमळाबाईचा मुंबईशी काय संबंध. यांच्याबरोबर युतीमध्ये शिवसेनेची 25 वर्षे सडली. आमच्यासोबत वाढले आणि आम्हालाच लाथा मारू लागले.
– आज माझ्या घराण्यावर बोलत आहेत, मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. पण भाजपवाल्यांचा वंश कोणता? इतके उपरे घेतले की, 52 कुळे आहेत की 152 कुळे हेच समजत नाही.
Web Title :- Devendra Fadnavis | BJP leaders devendra fadnavis targets shivsena chief uddhav thackeray dasara mumbai melava mahavikas aghadi maharashtra politics
हे देखील वाचा :
Pune Crime | चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणार्या 48 वर्षाच्या नराधमाला अटक
Pimpri Pune Crime | पत्नीचा खून करून पतीची गळफास घेत आत्महत्या, भोसरी परिसरातील घटना