पुणे : बहुजननामा ऑनलाइन टीम – पुणे महानगरपालिकैची होणारी मुख्यसभा ही ऑनलाईन न घेता प्रत्यक्ष घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आई पुण्याचे पालकमंत्री अजित पवार अनुकुल असल्याने, आता महापालिकेची ऑनलाईन मुख्यसभा ‘ऑफलाईन’ होण्याची शक्यता आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार टाळेबंदी काळात सभा ह्या ऑनलाईन घेण्याPMVत आल्या होत्या. प्रत्यक्षात सभा घेण्याबाबत अजित पवार यांनी याबाबत मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन पवार यांनी दिल्याची माहिती पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी दिली आहे.
दरम्यान, लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्यात आले असून आता महापालिकेची मुख्यसभा प्रत्यक्ष घेण्याबाबत सर्व नगरसेवक आग्रही आहेत. मागील काही महिन्यांपासून मुख्यसभा प्रत्यक्षात घेण्याबाबत नगरसेवकांच्या मागणीवरुन महापौरांकडून राज्यशासनाकडे मागणीसाठी पत्र पाठवण्यात आले होते. मात्र त्यावेळी, राज्य शासनाकडूनही परवानगी देण्यात आलेली नाही. तर ५ फेब्रवारीला अजित पवार पुण्यात आले होते. यावेळी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी पवार यांच्याकडे पालिकेची मुख्य सभा प्रत्यक्षात घेण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली. त्यावेळी या मागणीचा सकारात्मक विचार करून पवार यांनी २०० लोकांचा परवानगी सह पालिका सभागृहात प्रत्यक्षात मुख्यसभा घेण्यास परवानगी देण्यात येईल असे आश्वासन दिले.
भाजपाकडून सोमवारी मुख्यसभा ऑनलाईन घेण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादी, काँग्रेस आदी विरोधी पक्षांनी भाजपावर ऑनलाईन सभेद्वारे चर्चा न करताच ठराविक ‘विषय’ मार्गी लावायचे असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे मुख्यसभा प्रत्यक्षात घेण्याची परवानगी मिळवून भाजपाचे मनसुबे उधळून लावण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचे विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी म्हटले आहे.