बहुजननामा ऑनलाइन टीम – दिल्लीच्या वेशीवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्रानं आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात हे आंदोलन सुरू आहे. पंजाबी सिंगर आणि अभिनेत्यांनीही याला पाठींबा दिला आहे. हॉलिवूड सिंगर, पॉप स्टार, अॅक्ट्रेस रिहाना (Rihanna) हिनंही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. यानंतर इंटरनॅशनल सेलेब्सही या आंदोलनावर मत व्यक्त करताना दिसले. रिहानानंतर ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg), एक्स अॅडल्ट स्टार मिया खलिफा (Mia Khalifa) यांनी देखील शेतकरी आंदोलनाबद्दल ट्विट केलं. ग्रेटानं केलेलं ट्विट आणि पुन्हा ते डिलीट केलं होतं. आता ग्रेटविरोधात पोलिसांनी FIR दाखल केली आहे.
स्वीडनची रहिवाशी पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग हिच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. भडकाऊ ट्विट केल्या प्रकरणी पोलिसांनी ही केस दाखल केली आहे. लवकरच या प्रकरणी पोलीस पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.