बहुजननामा ऑनलाइन टीम – शेतकरी आंदोलनाच्या बंदोबस्ताची जबाबदारी असलेल्या पोलीस उपायुक्त व अतिरिक्त पोलीस उपायुक्त(DCP Corona) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी एका टिष्ट्वटद्वारे ही माहिती दिली आहे.
पंजाब व हरियानासह अनेक राज्यातील शेतकरी सध्या दिल्लीतील सीमेवर गेल्या १६ दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. ते शेतकरी दिल्लीत प्रवेश करणार्या वेगवेगळ्या मार्गावर आंदोलन करीत आहे. या आंदोलनाच्या जागेपैकी सिंगू बॉर्डरवरील तीन मैदानातील बंदोबस्ताची जबाबदारी या पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस उपायुक्त यांच्यावर होती. या दरम्यान, हे दोन्ही अधिकारी असंख्य लोकांना भेटले आहेत. त्यांना नेमका कोणाकडून संसर्ग झाला याची माहिती पुढे आलेली नाही. शेतकरी आंदोलनात सध्या असंख्य शेतकरी सहभागी आहेत. त्यातील बहुतांश लोक हे मास्क वापरताना दिसत नाही. जर या आंदोलनातील शेतकर्यांमध्ये कोरोना संसर्ग झाला तर हा संसर्ग असंख्य लोकांमध्ये पसरण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.
सध्या महाराष्ट्र, पश्चिम बंगाल खालोखाल दिल्लीमध्ये नव्याने कोरोना बाधित आढळून येत आहेत.