सुरत : वृत्त संस्था – Crime News | पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे (gangster Gajanan marne) याची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांची मुंबई -पुणे एक्सप्रेसवे (Mumbai-Pune Expressway) वरुन जंगी मिरवणुक काढण्यात आली होती. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होऊन आता त्याला पुन्हा तुरुंगाची हवा खावी लागली आहे.
सुरतमध्ये कारागृहातून सुटलेल्या दारु तस्कर गुन्हेगाराचे फटाके फोडून स्वागत करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरत(surat)मधील लिंबायत या भागात राहणार्या कैलाश पटेल (Kailash Patel) नावाचा गुन्हेगार हत्या (Murder) केल्याच्या आरोपावरुन तुरुंगात गेला होता. रविवारी जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. त्यानंतर त्याच्या समर्थकांनी त्याचे मिरवणुक काढून जंगी स्वागत केले. वाटेत फटाके फोडण्यात आले.
दारु तस्करी (Alcohol smuggling) च्या आरोपाखाली एका गुंडाला पोलिसांनी अटक (Arrest) केली होती. त्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. या तस्काराची हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या आरोपावरुन कैलाश पटेल हा तुरुंगात होता. त्याची रविवारी जामिनावर सुटका झाली होती. गुजरात(gujrat)मध्ये दारुबंदी आहे. असे असले तरी संपूर्ण राज्यात दारुची तस्करी मोठ्या प्रमाणावर चालते. सुरतमधील लिंबायत क्षेत्रात दारु तस्करांमध्ये वर्चस्वावरुन नेहमीच वाद होत असतात. त्यातूनच खुन, मारामार्या नेहमीच होत असतात.
web title: crime news after his release from prison a gang of thugs took out a procession like punes gajanan marne.