नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन आपल्या पत्नीच्या एका फोटोने इतका चिडला की, त्याने सोशल मीडियावरच आपल्या पत्नीच्या पोस्टवर विचित्र कमेंट केली. अश्विनची पत्नी पृथ्वीने साऊथ इंडियन अॅक्ट्रेस त्रिशासोबत एक फोटो ट्विट केला. यात तिने अश्विनलाही टॅग केलं. मग काय अश्विन या फोटोने खूपच संतापला. या पोस्टवर कमेंट करत म्हटला की, ‘बंद कर हे सगळं.’
https://twitter.com/prithinarayanan/status/1167511007427608576
अश्विन त्रिशाचा जबरा फॅन
ऑफ स्पिनर अश्विन त्रिशाचा खूप मोठा फॅन आहे. तो शाळेपासून त्रिशाला खूप पसंत करतो. त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. की, त्याने शाळेत असतानाच त्रिशाच्या नावाने फॅन क्लब सुरू केला होता. जेव्हा अश्विनच्या पत्नीने त्याच्या फेवरेट अॅक्ट्रेस सोबत सेल्फी काढला तेव्हा अश्विनला रहावलं नाही. त्याने रिप्लाय करत म्हटलं की, “मला चिडवणं बंद कर. मला आहे हे सगळं सहन नाही होत.”
वेस्ट इंडिज दौऱ्यात नाही मिळाले स्थान
अश्विनला वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या दोन्ही टेस्ट मॅचमध्ये संधी मिळाली नाही. त्याच्याऐवजी एंटीगा आणि जमैका टेस्ट मॅचमध्ये रवींद्र जडेजाला घेण्यात आलं. अश्विनला संधी न मिळाल्याने कॉमेंट्री टीममध्ये समाविष्ट असलेले सुनील गावस्कर नाराज दिसले. परंतु रवी शास्त्री यांनी यामागील कारण सांगितले. रवी शास्त्री यांच्या मते, वेस्ट इंडिज विरुद्ध अंतिम 11 मध्ये रवींद्र जडेजाची निवड यासाठी करण्यात आली कारण त्याच्या फलंदाजीत सुधारणा झाली आहे आणि सपाट पीचवर गोलंदाजीमधील त्याचे नियंत्रणही उत्तम आहे. याशिवाय जडेजा जगातील सर्वात चांगल्या फिल्डर्सपैकी एक आहे.
- आरोग्यविषयक वृत्त –
पाणी किती प्यावे, याबाबतचे समज आणि गैरसमज, काय सांगते आयुर्वेद - टॉनिक प्रमाणे काम करते ‘काजूची पावडर’ ,रोज खाल्ल्याने दूर होतात १० अडचणी
- सुंदर त्वचेसाठी मेकअपपेक्षाही अधिक गरजेचा आहे ‘संतुलित आहार’
- ‘या’ बीया दूधातून घ्या ; थकवा, कमजोरी दूर करा, उर्जा प्राप्त करा, जाणून घ्या
- दूर होईल ‘श्वेत प्रदर’ची समस्या, करा ‘या’ ६ पैकी कोणताही १ उपाय, जाणून घ्या
- पुरुषांनी का प्यावे ‘खारीकचे दूध’, ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या
- नोकरदार महिलांनी पाळावे व्यायामाचे ‘हे’ नियम, होतील हे फायदे
- गर्भवती महिलांसह ‘या’ ८ लोकांना डास अधिक चावतात, ‘ही’ आहेत कारणे
- ‘हे’ आहे प्रियंका, अनुष्का, करिना, ऐश्वर्या आणि सोनाक्षीच्या सौंदर्याचे गुपित !
- ‘एसी’ मुळे होऊ शकतात ‘हे’ १० आजार, असा करा बचाव, जाणून घ्या उपाय