नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. यासाठी कोविन ॲप सुरु करण्यात आले आहे. या ऍपच्या माध्यमातून नोंदणी करून लस घेता येते. मात्र, आता 18-44 वर्षांवरील सर्व नागरिकांना ऑनलाईन अपॉइंटमेंटशिवाय लस दिली जाणार आहे. याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे.
कोविन पोर्टलवरील नोंदणीच्या माध्यमातूनच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लस देण्याची घोषणा केली. त्यानंतर हे ऍप डाऊन झाले होते. बुकिंग करणे, स्लॉट ठरवणे यामध्ये अडचणी येऊ लागल्या होत्या. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गावातील लोकांकडे स्मार्टफोन्स नव्हते. त्यामुळे स्लॉक बुक करताना यापूर्वी अडचणी येत होत्या. याशिवाय अनेक राज्यात नागरिकांनी स्लॉट बुक करूनही हजर राहिले नव्हते. परिणामी, लसींची नासाडी झाली होती. त्यामुळे आता हा निर्णय घेतला आहे.
‘आता 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना लस घेण्यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही. मात्र, रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. तुम्ही आधीच रजिस्ट्रेशन केले असेल तर लस मिळू शकते. तसेच रजिस्ट्रेशन केले नसेल तर लसीकरण केंद्रावर रजिस्ट्रेशन करून तुम्हाला लस दिली जाईल. ऑनलाईन अपॉइंटमेंट दरम्यान अनेक ठिकाणी लस वाया गेल्याचं समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे’, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
On-site registration & appointment is now being enabled for the 18-44 years age group on CoWIN. However, this feature is being enabled only for Government #COVID Vaccination Centers (CVCs), at the present moment in time: Union Ministry of Health and Family Welfare
— ANI (@ANI) May 24, 2021
सुविधा फक्त सरकारी लसीकरण केंद्रावरच
सध्या ही सुविधा फक्त सरकारी लसीकरण केंद्रावरच उपलब्ध असेल. आतापर्यंत लसीकरण केंद्रावर 45 वर्षांवरील लोकांनाच अपॉइंटमेंटशिवाय लस दिली जात होती. तर 18 ते 44 वयोगटातील लोकांना कोविन पोर्टलवर रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन स्लॉट बुकिंग करावे लागत होते.
आत्तापर्यंत 19 कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण
देशात आत्तापर्यंत 19.60 कोटींपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मात्र, सध्या लसींचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे 18-44 वर्षांवरील सर्वांचे दिल्ली, पंजाब आणि महाराष्ट्रात लसीकरण बंद करण्यात आले आहे.