नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसची व्हॅक्सीन लवकरच भारतात सुद्धा येऊ शकते. सरकार लसीकरण अभियानांतर्गत टप्प्याटप्प्याने देशातील लोकांना ही व्हॅक्सीन देण्याची तयारी करत आहे. मात्र, व्हॅक्सीनबाबत योजना बनवणार्या टीममध्ये सहभागी एक्सपर्टचे म्हणणे आहे की, ही व्हॅक्सीन लोकांना औषधाच्या दुकानात सुद्धा मिळावी. मात्र, ही योजना 2021 च्या दुसर्या तिमाहीपर्यंत उपलब्ध व्हॅक्सीनच्या संख्येवर अवलंबून आहे.
नाव न जाहीर करण्याच्या अटीवर व्हॅक्सीनबाबत निर्णय घेणार्या एक्टपर्टच्या टीममधील एका सदस्याने सांगितले की, सध्या यावर विचार सुरू आहे की, जे लोक सरकारी अभियानाशिवाय स्वता आपल्या व्हॅक्सीनचा खर्च करू शकतात त्यांच्यासाठी औषधाच्या दुकानात ती औषधाच्या दुकानात उपलब्ध होईल. व्हॅक्सीनच्या किंमतीवर सबसिडी सुद्धा दिली जाऊ शकते. मात्र, यासाठी काही नियम असतील.
अगोदरही झाले आहे असे?
व्हॅक्सीन जनतेपर्यंत पोहचण्याच्या प्रक्रियेत काम करणार्या टीमचा भाग आणि सरकारमध्ये वरिष्ठ पदावर असलेल्या एका अधिकार्याने सांगितले की, यापूर्वी इन्फ्लूएंजाची व्हॅक्सीनबाबत सुद्धा असा निर्णय घेतला गेला आहे, जे लोक लस खरेदी करण्यास सक्षम आहेत ते अटीनुसार औषधाच्या दुकानातून लस घेऊ शकतात.
पुढील वर्षी 30 कोटी भारतीयांना दिली जाईल लस
सरकारने हे अगोदरही सांगितले आहे की, भारतात पुढील वर्षी जुलैपर्यंत 30 कोटी अशा लोकांना लस दिली जाईल, ज्यांना सर्वात जास्त धोका आहे. सध्या सरकार अशा लोकांची यादी बनवत आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात सुमारे 3 कोटी आरोग्य सेवांशी संबंधीत लोक आणि फ्रंट लाइन वर्कर्सला लस दिली जाईल.