बहुजननामा ऑनलाइन टीम – देशात कोरोना व्हायरसच्या रूग्णांचा आकडा 99 लाखांच्या पुढे गेला आहे. मागील 24 तासांमध्ये एकुण 22 हजार 65 लोकांचा कोरोना रिपोर्ट (Covid-19)पॉझिटिव्ह आला आहे. 34 हजार 477 लोक कोरोनातून बरे झाले. तर, 354 लोकांचा मृत्यू झाला. देशात संक्रमितांचा एकुण आकडा 99 लाख 6 हजार 165 झाला आहे. कोरोनातून 94 लाख 22 हजार 636 लोक बरे झाले आहेत. आतापर्यंत या व्हायरसच्या संसर्गाने 1 लाख 43 हजार 709 लोकांचा जीव गेला आहे. सध्या 3 लाख 39 हजार 820 रूग्णांवर उपचार सुरू आहे, म्हणजे या कोरोनाच्या अॅक्टिव्ह केस आहेत.
कोरोनाच्या अॅक्टिव्ह केसच्या प्रकरणांमध्ये जगात भारत आठव्या स्थानांवर आहे. कोरोना संक्रमितांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगातील दुसरा सर्वात प्रभावित देश आहे. जगात अमेरिकेनंतर सर्वात जास्त रिकव्हरी भारतात झाली आहे. मृत्यूच्या प्रकरणात अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारताचा नंबर आहे.
महाराष्ट्रात 2949 लोक मागील 24 तासांच्या आत संक्रमित आढळले. 4610 लोक बरे झाले आणि 60 लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 18 लाख 83 हजार 365 लोकांना संसर्ग झाला आहे. यामध्ये 72 हजार 383 रूग्णांवर उपचार सुरू आहे. 17 लाख 61 हजार 615 रूग्ण बरे झाले आहेत. संसर्गाने जीव गमावणार्यांची संख्या आता 48 हजार 269 झाली आहे.
गुजरातमध्ये मागील 24 तासात 1120 लोक संक्रमित आढळले. 1389 लोक बरे झाले आणि 11 लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 2 लाख 28 हजार 803 लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी 12 हजार 918 रूग्णांवर उपचार सुरू आहे. 2 लाख 11 हजार 703 लोक आतापर्यंत बरे झाले, तर 4182 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाबाबत दिल्लीत चांगली बातमी आहे. दिल्लीत पॉझिटिव्हिटी रेटमध्ये मोठी घसरण नोंदली गेली. मागील 24 तासात येथे एकुण 69 हजार 944 टेस्ट करण्यात आल्या, ज्यामध्ये केवळ 1376 नवीन प्रकरणे समोर आली. म्हणजे पॉझिटिव्हिटी रेट 2.15% राहीला. हा दिल्लीतील आतापर्यंतचा सर्वात कमी आहे.