नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या लोआ येथे रंगमंचावर परफॉर्म करत असताना एक सिंगर गाणे गाण्यात एवढा मग्न झाला की, त्याला कळाले नाही की त्याच्या केसांना कधी आग लागली. आग लागल्यानंतरही या सिंगरने आपल्या सूरात गाणे चालू ठेवले आणि त्याच्या मागे असलेल्या बँडमध्ये काम करणाऱ्या काही लोकांनी केसांमधील आग विझविली. या दरम्यान सिंगर घाबरला नाही तर गिटार वाजवतच राहिला.
लोआ मधील डेट्रॉईट रॉक सिटीची ही घटना आहे जिथे हिप हॉप सिंगर बॉबी जेन्सन आपल्या बँडसह एक KISS क्लासिक शो करत होता. यावेळी, गायक आणि गिटार वादक बॉबी सादर करत असताना त्यांच्या गाण्यांना प्रेक्षक चांगले एन्जॉय करत होते. दरम्यान, स्टेजवर मागे लावलेल्या फायर वर्कमुळे एक ठिंणगी उडली ज्यामुळे सिंगरच्या केसांना आग लागली.
आगीनंतरही सिंगर बॉबी जेन्सन सतत गाणे गाऊ लागला. जेव्हा त्याच्या बॅन्डमध्ये काम करणाऱ्या इतर लोकांनी हे पाहिले तेव्हा ते पळत आले आणि सिंगरच्या केसांमधील आग विझविण्याचा प्रयत्न करु लागले. यावेळी, जेन्सन आपले गाणे गाण्यात मग्न होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कार्यक्रम संपल्यानंतर सिंगर जेन्सन याने सांगितले की, त्याचे खरे केस जळाले आहेत आणि त्याने कोणतेही विगचा वापर केला नाही. त्याने या घटनेवर बोलताना सांगितले की, ‘आता माझ्याकडे अॅलिस कूपरचे चांगले कट आहे.’