बहुजननामा ऑनलाईन – गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची कोरोनाची लाट अतिशय महाभयंकर आहे. जलद गतीने कोरोना बाधितांची संख्या आढळून येत आहे. ज्या स्थळी आपण असता त्या ठिकाणीही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. ते ठिकाण सुरक्षित असलं तरीही. कुटूंबातील व्यक्ती बहरून घरी आले तर व्यवस्थित स्वच्छता न राखल्यास संसर्गाच प्रमाण होण्यास मदत होऊ शकते. या पार्श्वभूमीवर रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रे CDC ने व्यक्ती कोरोना संसर्गापासून कस बचाव करू शकतो याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
१. हात साबणानं व्यवस्थित धुवा –
आपले हात साबण आणि पाण्यानं व्यवस्थित धुवा. जर पाणी उपलब्ध नसेल तर सॅनिटायजरचा वापर करा. आपले डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नका.
२. मास्क व्यवस्थित घाला –
जेव्हाही व्यक्ती घरातून बाहेर पडते तेव्हा मास्क घालायलाच हवा. नाक, तोंड व्यवस्थित झाकलं जायला हवं. मास्क लावल्यानंतर श्वास घ्यायला त्रास होणार नाही. याची काळजी घ्या
३. सहा फुटांचे अंतर –
बाहेर वावरताना ६ फुटांचे अंतर ठेवणं आवश्यक आहे. लक्षात घ्या की लक्षणं नसलेले लोकही कोरोना संसर्ग पसरवू शकतात. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. व्यक्ती जितक्या अधिक लोकांच्या संपर्कात याल तेवढे संसर्ग वाढण्याची शक्यता असणार आहे.
४. शिंकताना तोंडावर रूमाल धरा –
जर व्यक्तीने मास्क लावला असेल आणि तरीही शिंका येत असतील मास्क अजिबात बाजूला करू नका. शिंकून झाल्यानंतर मास्क बदला आणि आपले हात साबणानं स्वच्छ धुवा. वापरलेला मास्क डस्टबिनमध्ये फेकून द्या. दरम्यान, वारंवार तापमान तपासून पाहावे. जास्त ताप किंवा अंगदुखीची, सर्दीची लक्षणं जाणवल्यास तात्काळ तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक.
५. घरचा परिसर स्वच्छ ठेवा –
ज्या जागांच्या वारंवार संपर्कात असता. बटणं, दरवाज्याचे हँण्ड्ल, डेस्क, फोन, किबोर्ड, नळ, सिंक वारंवार स्वच्छ करत राहायला हवे. तसेच, आपण जेवण एकमेकांना देऊ नये, ग्लास, कप, ताट वेगळं ठेवल्यास संक्रमणाचे प्रमाण कमी होईल.
६. घरी आल्यावर त्वरित अंघोळ करा –
ऑफिस किंवा कुठूनही घरी आल्यानंतर लगेचच अंघोळ करायला हवी. अंघोळ करणं शक्य होत नसल्यास स्वच्छ हात पाय धुवावेत.