बहुजननामा ऑनलाइन टीम – शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचो 363 नवे पॉझिटिव्ह(Coronavirus) आढळून आले असून कोरोनामुळं चौघांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील एकाचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. कोरोनामुळं आतापर्यंत पुण्यात तब्बल 4 हजार 559 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 268 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्या पुण्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 75 हजार 117 एवढी झाली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 65 हजार 514 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात कोरोनाचे 5 हजार 44 रूग्ण अॅक्टीव्ह आहेत. एकुण अॅक्टीव्ह रूग्णांपैकी 373 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 226 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.