नाशिक : बहुजननामा ऑनलाइन टीम – 16 जानेवारी पासून देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. आता 10 मार्चनंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी कोरोना लस उपलब्ध होऊ शकते अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. आतापर्यंत 81 टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं.
ते म्हणाले, 36 हजार लोकांचं लसीणकरण होणं अपेक्षित होतं. त्यापैकी 29 हजार लोकांचं लसीकरण झालं आहे. लस घेतल्यानं कोणतेही साईड इफेक्ट्स होत नसल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
कोरोना लसीकरणाला देशभरात सुरुवात झाली आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात एकूण 3006 लसीकरण केंद्र बनवण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात देशातील सरकारी आणि प्रायव्हेट रुग्णालयातील 3 कोटी हेल्थकेअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सला लस दिली जात आहे.
तज्ज्ञांनी सांगितलं की, पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाईल. लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 2 आठवड्यांनी कोरोना विरोधात अँटीबॉडी विकसीत होतील. तसंच कोरोना लसीकरणानंतरही कोविडचे नियम पाळणं अनिर्वाय आहे असंही तज्ज्ञ सांगतात.