नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कंत्राटी बेसिसवर काम करणाऱ्या कर्मचार्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वेज कोड ड्राफ्ट नियमातील तरतूदीनंतर आता करारावर काम करणाऱ्या कर्मचार्यांनाही बोनस मिळणार आहे.
जर तुम्ही एखाद्या कंत्राटदारामार्फत एखाद्या कंपनीत किंवा संस्थेत काम करत असाल तर आता तुम्हाला कंत्राटदारामार्फत काम करण्याचा बोनस मिळेल. वेज कोडच्या ड्राफ्ट नियमात असलेल्या तरतुदीनुसार कंपनी किंवा संस्थेने हे सुनिश्चित केले पाहिजे की कंत्राटदार आपल्याला बोनस देण्यास नकार देऊ शकत नाही.
जर कंत्राटदार बोनस देत नसेल तर कंपनी किंवा संस्था कंत्राटी कर्मचार्यांना बोनस देईल. कामगार मंत्रालयाने १ डिसेंबर रोजी कोड ऑन वेजेससंदर्भातील ड्राफ्टवर निश्चित मत मागितले आहे. जर पगार २१,००० पर्यंत असेल तर आपल्याला बोनस मिळेल. महिना संपण्यापूर्वी कंपनीने कंत्राटदाराला पैसे द्यावे.
Visit : bahujannama.com