मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरुन (Andheri By Election) राज्यात मोठे सत्तानाट्य सुरु आहे. महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विरुद्ध भाजप (BJP), असे युद्ध सुरु झाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल (Murji Patel) अशी लढत होणार आहे. आता निवडणुकीपूर्वी दोनही बाजुंनी टीका आणि आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आज (दि. 14) शेवटच्या दिवशी दोनही उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यावर दोनही गटांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले. या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंची मशाल काँग्रेसच्या हातात आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्याच्या इतिहासात अनेकदा अशा निवडणुकीत उमेदवाराला जनतेची सहानुभूती मिळते.
पण उद्धव ठाकरेंनी मशाल जरी हातात घेतली असली तरी त्यांची कृती काँग्रेससोबत (Congress) आहे.
वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत त्यांची कृती आणि युती आहे. त्यांची मशाल काँग्रेसच्या हातात आहे.
दुसरीकडे ज्या हाताने मशाल पकडली आगे त्यावर घड्याळ बांधले आहे. ते शरद पवारांचे आहे. त्यामुळे हिंदुत्वावादी माणसाने पंजा आणि घड्याळासोबत मशाल पाहिली, तर तो मशालीला कधीच आपले मत देणार नाही, असे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या मशालीत शरद पवार (Sharad Pawar) तेल टाकत आहेत.
त्यांनी ती मशाल कितीही पेटविण्याचा प्रयत्न केला तरी, भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)
यांच्या नेतृत्वात असलेली बाळासाहेबांची शिवसेना ती विझवल्याशिवाय राहणार नाही.
पंजा आणि घड्याळासोबत गेलेल्या उद्धव ठाकरेंचा विचार आम्ही मोडीत काढणार आहोत, असे बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, अंधेरी पूर्व येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीचा सामना आता कुठे रंगू लागला आहे.
यात आगामी काळात काय काय होणार, आणि अखेर कोण विजयी होणार, याकडे मुंबईसह महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Chandrashekhar Bawankule | uddhav thackerays torch is in the hands of congress and ncp and sharad pawar is pouring oil on it chandrasekhar bawankules statement
हे देखील वाचा :
Pune Crime | पूर्वमैनस्यातून मंगळवार पेठेत तरुणावर कोयत्याने सपासप वार
Ashish Shelar | शिवसेनेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचे नाव बदलून ‘रडकी सेना’ ठेवायला पाहिजे