पुणे : बहुजननामा ऑनलाइन – मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Bangalore National Highway) एनडीए चौकातील NDA Chowk (चांदणी चौक-Chandni Chowk) दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यासाठी व नवीन पुलाच्या कामासाठी खडक फोडण्याचे काम सुरू असून आज (दि.10) पासून काम पूर्ण होईपर्यंत दररोज मध्यरात्री 12.30 ते 1.00 वाजेपर्यंत अर्ध्या तासासाठी चांदणी चौक (Chandni Chowk) येथील सर्व बाजूची वाहतूक बंद (Traffic Stop) राहणार आहे.
सद्यस्थितीत जुन्या पुलाच्या ठिकाणी साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या तीन लेन व मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या साडे चार लेन उपलब्ध करून देण्यात आल्या असून चांदणी चौक भागातील वाहतूक कोंडीची समस्या काही अंशी कमी झाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
वाहतुकीच्या बदलाची नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे (National Highways Authority of India) प्रकल्प संचालक एस.एस. कदम (S.S. Kadam) यांनी केले आहे.
Web Title :- Chandni Chowk | Traffic at Chandni Chowk will remain closed for half an hour at night till the work is completed
हे देखील वाचा :
Pune Crime | बहिणीला भेटायला आल्याच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण
Pune Cyber Crime | मोबाईलवरुन हॉटेल बुकींग पडले एक लाखाला; दत्तवाडी परिसरातील घटना