बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली, दि. 9 फेब्रुवारी – ट्विटरला धडा शिकवण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केलीय. याधर्तीवर आता केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ‘कू’या अॅपला जॉईन होण्याचे जाहीर केलं आहे.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ‘कू’या अॅपला जॉईन होण्याची घोषणा अशावेळी केलीय, जेव्हा केंद्र सरकारच्या मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवरून बराच काळ वाद सुरू आहे. ट्विटर अकाउंटवर सेन्सॉर करणे व शेतकरी आंदोलनचे ट्विट यावरुन ट्विटर आणि सरकारमधील वाद वाढत आहे. अशा परिस्थितीत सरकार ट्विटरऐवजी देशी ‘कू’ अॅपची जाहिरात करत आहे. ट्विटरवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. हे आता केंद्र सरकारच्या लक्षात आलं आहे.
या सरकारला आशा आहे की, ज्याप्रमाणे एलोन मस्कच्या ट्विटने लोकांना व्हॉट्सअॅपवरुन सिग्नल अॅपवर हलविले, त्याचप्रमाणे सरकारच्या या हालचालीमुळे भारतातून ट्विटर निघून जाईल अन् मायक्रो-ब्लॉगिंग अॅप ‘कू’ येईल. तसे झाल्यास ट्विटरचे मोठे नुकसान होणार आहे.
जाणून घ्या काय आहे ‘कू’?
‘कू’ हे अॅप ट्विटर सारखेच आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात ‘कू’ अॅप लाँच केले होते. यात भारतीय भाषांचा समावेश आहे. स्थानिक अॅपला प्रोत्साहन म्हणून भारत सरकारने आयोजित केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ यात ‘कू’ अॅप विजेता ठरला आहे. हे अॅप वापरकर्त्यांला मजकूर, ऑडिओ, व्हिडिओमध्ये संदेश पाठविण्याचा पर्याय देत आहे. तसेच यात ट्विटरप्रमाणेच लोकांना फॅलो करता येत आहे.
मंत्र्यांनी हे केले ट्विट
कॅबिनेट मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवर असे सांगितले आहे की, मी आता ‘कू’ अॅपवर आहे. आपण सर्व भारतीय सूक्ष्म ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कू’वर माझ्याशी संपर्क साधू शकता, जिथे रिअल टाइम एक्सक्लुझिव्ह अपडेट्स उपलब्ध असतील. चला ‘कू’ अॅपवर आपण आपले विचार मांडूया.
गोयल हे मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकाळात हि वाणिज्य व उद्योग, रेल्वे, ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयांची जबाबदारी असलेले कॅबिनेट मंत्री आहेत. पीयूष गोयल व्यतिरिक्त ‘कू’ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री रविशंकर प्रसाद आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यासह इतर राजकारणी नेत्यांची अकाऊंट आहेत. याचबरोबर विविध शासकीय मंत्रालये आणि विभागांचेही आकाऊंट आहेत.