नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची तपास सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे वर्ग केल्यापासून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. अशातच सनदी अधिकारी अशोकच खेमका यांनी सीबीआयच्या कार्यप्रणालीवर सवाल उपस्थित केले आहेत. याआधी सुद्धा खेमका यांनी लोकायुक्त, लोकपाल आणि मुख्य माहिती आयुक्तांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते.
अशोक खेमका यांनी ट्विट करत सीबीआयच्या भूमिकेवर आणि वार्षिक बजेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, ‘सीबीआयचे वार्षिक बजेट ८०० कोटी रुपयांचे आहे. तसेच कुणाला शिक्षा झाली, कोण निर्दोष झाले, कोणाला फाशी देण्यात आली, जबाब कशापद्धतीने निश्चित केला जातो? मागील वर्षाचा हिशोब तपास, आजतागायत कोणत्या मोठ्या व्यक्तीस शिक्षा झाली?,’ असे सवाल त्यांनी विचारले आहेत. हत्तीचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, असे म्हणत सीबीआयच्या कार्यप्रणालीवर खेमका यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
CBI का सालाना बजट 800 करोड़ रुपये। किसे सजा हुई, कौन बरी हुआ, किसे लटकाया, जवाबदेही कैसे तय हो? पिछले सालों का ही हिसाब कर लो। किस बड़े आदमी की सजा हुई? हाथी के दांत दिखाने के कुछ और खाने के कुछ और होते हैं।
— Ashok Khemka (@AshokKhemka_IAS) August 31, 2020
तथापि, खेमका यांनी दोन दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचाराच्या दिनाच्या सेलेब्रेशबाबत ट्विट करत भ्रष्टाचाराची व्याख्याच सांगितली. ‘राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन केल्याने भ्रष्टाचार कमी होत नाही, तर त्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी किती पैसे खर्च झाला, याचा तपास केल्यास भ्रष्टाचार उघडकीस येतो,’ असे त्यांनी म्हटलं आहे. आपल्या आयएएस कार्यकाळात अशोक खेमका यांच्या तब्बल ५३ ठिकाणी बदल्या करण्यात आल्या. म्हणून कडक शिस्तीचा आणि भ्रष्टाचाराची चीड असलेला अधिकारी असे त्यांना ओळखलं जात.