नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या आजारासोबत म्यूकोरमायकोसिस म्हणजे ब्लॅक फंगस नावाच्या आजाराने सुद्धा लोकांचे टेन्शन वाढवले आहे. कोरोना रिकव्हरीनंतर होणार्या या आजाराचे रूग्ण वाढत चालले आहेत. आता प्रश्न हा उपस्थित होत आहे की, ब्लॅक फंगस आणि कोविड संसर्ग एकाच वेळी होऊ शकतो का? मेडिसिननेटमध्ये प्रसिद्ध एका रिपोर्टनुसार फंगल संसर्ग आणि कोविड-19 संसर्ग एकाच वेळी होऊ शकतो. असे विशेष करून त्या रूग्णांमध्ये दिसून येऊ शकते ज्याची स्थिती खुप गंभीर आहे आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागेल असेल. याशिवाय ज्यांना एचआयव्ही किंवा डायबिटिज आहे, त्यांनाही असे होऊ शकते.
कोविड-19 च्या सोबत ब्लॅक फंगसचा संसर्ग अतिशय धोकादायक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. बहुतांश प्रकरणात रूग्ण कोविडमधून बरा झाल्यानंतर ब्लॅक फंगस संसर्ग दिसून येतो. जगभरातील मेडिकल एक्सपर्ट या फंगल संसर्गावर बचावाचे मार्ग शोधत आहेत.
कोविड-19 सह कोणत्या प्रकारचा फंगल संसर्ग होऊ शकतो
मेडिकलनेटनुसार दोन सर्वात सामान्य फंगल संसर्ग आहेत. ते आहेत – एसपरजिलोसिस आणि इनव्हेसिव्ह कँडिडियासिस. याशिवाय म्यूकोमायकोसिस आणि हिस्टोप्लासमोसिस आणि कँडिडा ऑरिस सारखे संसर्ग सुद्धा आहेत. फंगल संसर्ग नेहमी हवेत फंगसची अस्तित्व असताना सतत श्वास घेतल्याने होतो.
एसपरजिलोसिस :
हा फुफ्फुसाचा आजार आहे. हा फ्यूमिगेटस फंगसमुळे होतो जो सामान्यपणे झाडे आणि मातीत आढळतो.
इनव्हेसिव्ह कॅडिडियासिस :
हा कँडिडा ऑरिस फंगसमुळे होतो. यामुळे संसर्ग झाल्याची सामान्य लक्षणे ताप आणि थंडी वाजणे ही आहेत. हा अँटीबायोटिक उपचाराने सुद्धा बरा होत नाही आणि या संसर्गाने मृत्यूसुद्धा होऊ शकतो.
म्यूकोरमायकोसिस किंवा ब्लॅक फंगस :
हा बुरशीचे काही ग्रुप ज्यांना म्यूकोमायकोसिस म्हणतात, त्यांच्यामुळे होतो. अशी बुरशी जी वातावरणात असते. ही त्या लोकांना जास्त प्रभावित करते ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत किंवा अशा औषधांचे सेवन करत आहेत जी शरीराची विषाणूशी लढण्याची क्षमता कमी करतात किंवा कमजोरी निर्माण करतात.