नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2021-22 या वित्तीय वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी काही मोठ्या घोषणा केल्या. कोरोना संकटामुळे आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला असून कोरोना प्रतिबंधक लसीचाही देखील यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत असताना शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारने उद्दिष्ट ठेवलं आहे.
महाराष्ट्रा संदर्भात बोलायचे झाले तर नाशिक आणि नागपूर मेट्रोला चालना मिळण्यासाठी निधीची घोषणा करण्यात आली. नाशिक मेट्रो फेज -1 आणि नागपूर मेट्रो फेज 2 ची घोषणा आज करण्यात आली. नाशिकसाठी 2092 कोटी आणि नागपूरसाठी 5976 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. याशिवाय 75 पेक्षा जास्त वय असलेल्या पेन्शनर लोकांना आयटी रिटर्नपासून मुक्ती देण्यात आली. मात्र, सामान्य करदात्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही.
अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणा
1. कोविड लसीकरणासाठी 35 हजार कोटींची तरतूद
2. 15 वर्षे जुन्या वाहनांसाठी ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’
3. आरोग्य क्षेत्रासाठी 2 लाख 23 हजार 846 कोटींच्या निधीची तरतूद
4 नवीन आरोग्य योजनांवर 64 हजार कोटी रुपयांची तरतूद
5. प्रत्येक जिल्ह्यात इंटिग्रेटेड लॅब उभारणीसाठी तरतूद
6. 15 अत्यावश्यक आरोग्य केंद्र आणि 2 मोबाईल हॉस्पिटलची घोषणा
7. 2030 पर्यंत हायटेक रेल्वेचं लक्ष
8. रेल्वेसाठी 1 लाख 10 हजार 55 कोटींच्या निधीची तरतूद
9. 2030 पर्यंत राष्ट्रीय रेल्वे योजना राबवणार
10. देशभरात 7 मेगा इन्व्हेंटमेंट पार्क उभारणार
11. डीएफआयसाठी 3 वर्षाकरिता 5 लाख कोटींच्या निधीची तरतूद
12. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी 1 लाख 78 हजार कोटींचा निधी
13. कापड उद्योगासाठी आवश्यक सर्व सुविधांसह येत्या 3 वर्षात 7 टेक्स्टाईल पार्कची निर्मिती
14 दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरात गॅस पाइपलाईनचा विस्तार करणार
15. रस्ते विभागासाठी 1 लाख 18 हजार 101 कोटींचा निधी
16. मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी 64 हजार कोटींची तरतूद
17] सार्वजनिक वाहतुकीतल्या बसेसची सुधारणा करण्यासाठी 18 हजार कोटी
18] गरज पडल्यास सरकार कोरोना लसीकरणासाठी आणखी निधी मंजूर करणार
19. नाशिक मेट्रो फेज 1 आणि नागपूर मेट्रो फेज 2 ची घोषणा
20. नाशिकसाठी 2092 कोटी तर नागपूरसाठी 5976 कोटींची तरतूद
21. सरकारी बँकांसाठी 20 हजार कोटींची तरतूद
22. विमा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक मर्यादा 49 वरुन 74 टक्क्यांवर
23. या वर्षी एलआयसी कंपनीचा आयपीओ बाजारात येणार
24. BPCL, Air India, IDBI, पवनहंसची निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण करणार
25. शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचे उद्दिष्ट
26. गहू उत्पादकांना 75 हजार 60 कोटींच्या मदतीकरता तरतूद
27. मोठ्या कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीमधून 1.75 लाख कोटींचा निधी उभारणार
28. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता-सिलिगुडी राष्ट्रीय महामार्गाची घोषणा
29. 16.5 लाख कोटी कृषी कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट
30. 1 हजार कृषी बाजारपेठा ऑनलाईन यंत्रणेशी जोडणार
31. 100 नवीन सैनिक स्कूलची घोषणा
32. सर्व क्षेत्रात सर्व पदावर महिलांना नोकरी करता यावी यासाठी प्रयत्न
33. असंघटित मजुरांसाठी ऑनलाईन पोर्टल निर्माण करणार
34. आदिवासी भागात 750 ‘एकलव्य’ शाळा उभारणार
35. लहान सिंचन प्रकल्पांसाठी 5 हजार कोटींची तरतूद
36. पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेसाठी 64 हजार कोटींची तरतूद
37. गगनयान मिशन डिसेंबर महिन्यात सुरु करणार
38. डिजिटल जनगणनेसाठी 3 हजार कोटीपेक्षा जास्त तरतूद
39. 5 वर्षात सागर मिशन अंतर्गत अभूतपूर्व संशोधनाचं लक्ष
40. समुद्र संशोधन करण्यासाठी 4 हजार कोटींची तरतूद
41. अनुसूचित जातीत मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिष्यवृत्ती
42. देशभरातील सर्व शहरी स्थानिक संस्थामध्ये जल जीवन मिशन राबवणार, यासाठी 2.87 लाख कोटींची तरतूद
43. सरकारला 80 हजार कोटींच्या निधीची गरज, निधी जमा करण्यासाठी अनेक योजना
44. लघु उद्योगासाठी 15 हजार 700 कोटींची तरतूद
45. उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 1 कोटीने वाढवणार
46. देशात उच्च शिक्षण आयोगाची निर्मिती, त्यासाठी कायद्यात सुधारणा करणार
47. लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ उभारणार
48. सौदी अरेबिया आणि जपानच्या मदतीने स्किल ट्रेनिंगवर काम सुरु
49. 3 वर्षात 5 लाख कोटींचा निधी उभारण्यासाठी डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूटशनची स्थापना करणारfr