नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत संचार निगम लिमिटेडकडून (BSNL) आपल्या वापरकर्त्यांसाठी एका नवा प्लान जारी करण्यात आला आहे. jio, Airtel आणि Vodafone, Idea च्या तुलनेमध्ये BSNLचे प्लान हे वापरकर्त्यांसाठी चांगले आहेत. तर युजर्ससाठी ६० दिवसांची वैधता आणि दररोज डेटा आणि कॉलिंग या साठी फायदा होणार आहे. बीएसएनएलचा केवळ १०८ रुपयांचा प्रीपेड प्लान अंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तर jio, Airtel आणि Vodafone, Idea इतक्या अल्प दरात दररोजचा डेटाचा कोणताही प्लान देत नाही.
दिल्ली आणि मुंबई एमटीएनएल नेटवर्कचा या प्लानमध्ये समावेश करण्यात आला आहे. अमर्यादित कॉलिंग शिवाय, या प्लानमध्ये Unlimited data मध्ये फायदा सुद्धा मिळतो. दरम्यान, 1 GB data संपल्यानंतर याची गती कमी होऊन 80 Kbps होते. म्हणजेच १०८ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सना 1 GB हाय स्पीड डेटा मिळतो. तसेच एकूण ५०० SMS ची सुविधा मिळते. यापूर्वी या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता होती. मात्र,आता टेलिकॉम सेक्टरमध्ये वाढलेल्या स्पर्धेमुळे कंपनीकडून प्रीपेड प्लानची वैधता २८ दिवसांऐवजी ६० दिवस इतकी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रक्रियेनुसार BSNL च्या या प्लानची तुलना दुसऱ्या टेलिकॉम कंपनी सोबत केल्यास जिओच्या या दरात जवळपास १२५ रुपयांच्या प्रीपेड प्लानवरुन येते. ज्यामध्ये वापरकर्त्यांना फक्त २८ दिवसांची वैधता मिळते. २८ दिवसांची वैधताबरोबर डेली 0.5 GB data आणि Unlimited calling आणि एकूण ३०० SMS मोफत मिळते. तर Airtel चा १२९ रुपयांचा प्रीपेड प्लानमध्ये 1 GB data २४ दिवसांच्या वैधतेबरोबर येतो. ज्यामध्ये Unlimited calling आणि ३०० SMS फ्री मोफत मिळते. Vodafone, Idea चा १२९ रुपयांचा प्लान आहे. ज्यात २४ दिवसांची वैधताबरोबर दररोजचा 2 GB data, अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० SMS उपलब्ध होते. .