बहुजननामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बिंधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. नुकतंच कंगनानं लव जिहाद कायद्यावर भाष्य केलं करत त्याला समर्थन दिलं आहे. नाव आणि धर्म लपवून हिंदू मुलीला फसवल्याची एक बातमी शेअर करत तिनं एक प्रश्न केला आहे.
लव जिहाद कायद्याला विरोध करणाऱ्यांनाही तिनं हाच प्रश्न विचारला आहे. कंगना ट्विट करत म्हणाली, रोज आपण अशा अनेक घटना ऐकतो. मला हे कळत नाही लव जिहाद कायद्याची तुम्हाला अडचण काय आहे. जर हे लव मॅरेज असेल आणि दोघं त्यांची खरी ओळख सांगून लग्न करत असतील तर हे दोघांसाठी चांगलं आहे. जर एखाद्या महिलेसोबत फसवणूक झाली तर तिच्या न्यायासाठी लढाई कोण लढेल ?
https://twitter.com/KanganaTeam/status/1336518001680637953?s=20
कंगनाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण यावर कमेंट करत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काहींनी तिचं हे ट्विट शेअर देखील केलं आहे.
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवी मध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.