मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) केसमध्ये ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या नारकोटीक्स कंट्रोल ब्युरो (NCB) नं गुरुवारी (दि 17 डिसेंबर 2020) बॉलिवूडमधील निर्माता, दिग्दर्शक करण जोहरला समन्स बजावलं होतं. एनसीबीला करण जोहरच्या एका पार्टीचा तपशील जाणून घ्यायचा आहे ज्या बॉलिवूडमधील अनेक ॲक्टर आणि ॲक्ट्रेस होत्या. आता करणनं समन्सला उत्तर दिलं आहे.
अशी माहिती आहे की, करणनं आपला वकिल आणि स्टाफच्या पदतीनं एक लेटर आणि पेनड्राईव्ह जमा करत या समन्सला उत्तर दिलं आहे. आता यानंतर एनसीबी नेमकी काय ॲक्शन घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
करणला त्याच्या घरी 2019 साली झालेल्या पार्टीशी संबंधित अनेक रेकॉर्ड सादर करायचे आहेत. या पार्टीचा व्हिडीओ करणनं सोशल मीडियावर शेअर केला होता. यावरून खूप गोंधळ झाला होता. स्टार्सवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप लावण्यात आला होता.
या पार्टीशी संबंधित अनेक प्रश्न जसे की, पार्टीमध्ये कोण होतं, कोणत्या कॅमेऱ्यानं शुटींग झालं होतं, आमंत्रण पत्रिका पाठवली होती का अशी माहिती करणला शुक्रवारी (दि 18 डिसेंबर) सादर करण्यास सांगितली होती. एनसीबीचं म्हणणं आहे की, करण जोहर कोणत्याही प्रकरणात संशयित नाही. ड्रग्ज केसमध्ये त्याच्याकडून काही माहिती घ्यायची आहे.
काय होत व्हिडीओत ?
करण जोहर यानं काही दिवसांपूर्वी राहत्या घरीच एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीचा व्हिडीओ करणनं सोशल मीडियावर शेअर केला होता. यात रणबीर कपूर, विकी कौशल, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, वरुण धवन, दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, झोया अख्तर, आर्यन मुखर्जी, मीरा राजपूत, शकून बत्रा असे अनेक कलाकार होते. करण जोहरनं हा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता.
व्हिडीओत सर्वजण नशेत आणि मद्यधुंद अवस्थेत दिसत होते. विकी कौशलजवळ पांढऱ्या रंगाचा अंमली पदार्थासारखा घटक दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी यावरून टीका केली होती. काही लोकप्रतिनिधींनी यावर कारवाई करण्याचं सांगितलं होतं. परंतु यात करण जोहर असल्यानं कारवाई झाली नाही असंही बोललं गेलं.
शिरोमणी अकाली दलचे आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी करण जोहरच्या पार्टीत उपस्थित असणाऱ्या स्टार्सवर ड्रग्स घेतल्याचा आरोप केला होता. त्यांनी स्टार्सला डोप टेस्टसाठीही आव्हान दिलं होतं. याशिवाय सिरसा यांनी मुंबई पोलिसांकडे या कलाकरांविरोधात FIR दाखल करण्याची मागणी केली होती.