नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस महामारीदरम्यान ब्लॅक फंगस किंवा म्युकोर्मिकोसिसने सुद्धा कहर सुरू केला आहे. सतत प्रकरणे समोर आल्यानंतर अनेक राज्यांमध्ये या आजाराला महामारी घोषित केले आहे. याची बहुतांश प्रकरणे त्या रूग्णांमध्ये दिसत आहेत, जे अगोदर कोविड-19 उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत किंवा बरे झाले आहेत.
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, डॉक्टर लोकांना सल्ला देत आहेत की…
1 चेहर्याच्या कोणत्याही भागात सूज
2 डोळ्यांच्या दृष्टीची समस्या
3 डोक्याच्या एखाद्या भागात वेदना
अशा लक्षणांकडे दुर्ल करू नये. जर कोविड-19 मधून बरे झालेल्या व्यक्तीला या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर त्यांनी तात्काळ ईएनटी स्पेशलिस्टशी संपर्क करावा.
एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया आणि एम्सचे डॉक्टर पीयूष रंजन यांच्यासह अनेक तज्ज्ञांनी म्हटले आहे की, एकदा संक्रमित झाल्यानंतर या फंगल संसर्गाचे लवकर निदान झाल्यास रूग्णाचा जीव वाचू शकतो.
त्यांनी म्हटले, लक्षण समजून घेण्यासाठी कोरोनाच्या रूग्णांनी दिवसाच्या उजेडात नाक, गाल आणि डोळ्यांच्या आसपास सूज, रंग बंदलणे, वेदना इत्यादीसाठी संपूर्ण चेहर्याची तपासणी केली पाहिजे.
दात ढीले होणे, तोंडाच्या आतील भाग काळा होणे यासारखी लक्षणे दिसत असतील, तर त्यांनी ही माहिती ताबडतोब डॉक्टरांना दिली पाहिजे. डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की, कोविड-19 मधून बरे होण्याच्या दरम्यान आणि नंतर ब्लड शुगर लेव्हलची सुद्धा चाचणी करत राहावे.