नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारने पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ)आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी) सह विविध लघु बचत योजनांवर व्याजदरात जानेवारी ते मार्च तिमाहीत कोणताही बदल केलेला नाही. मुदत ठेवीवर व्याजाचे दर कमी असताना सरकारने सामान्य लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय छोट्या कालावधीच्या बचत योजनांवर व्याज जैसै थे ठेवले आहे. सरकारच्या या निर्णयानंतर पीपीएफवर 7.1 टक्के आणि एनएससीवर 6.8 टक्क्याच्या दराने व्याज मिळणे जारी राहील. अर्थ मंत्रालय तिमाही आधारावर अल्प कालावधीच्या बचत योजनांवर व्याजाशी संबंधीत अधिसूचना जारी करते.
अर्थ मंत्रालयाकडून जारी अधिसूचनेत म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2020-21 च्या चौथ्या तिमाहीत विविध लघु बचत योजनांवर व्याजदर तिसर्या तिमाहीच्या अधिसूचनेत जारी दरावर कायम ठेवत आहे. सरकारच्या या अधिसूचनेनुसार पाच वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर व्याजाचा दर 7.4 टक्केवर कायम ठेवण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांशी संबंधीत या स्कीमवर तिमाही आधारावर व्याज दिले जाते. सेव्हिंग डिपॉझिटवर व्याजदर वार्षिक चार टक्केवर कायम ठेवण्यात आला आहे.
अशाच प्रकारे मुलींशी संबंधीत बचत योजना सुकन्या समृद्धी योजनेवर तिसर्या तिमाहीत सुद्धा 7.6 टक्केच्या दराने व्याज मिळत राहील. सरकारने अशाप्रकारे किसान विकास पत्र (केव्हीपी) वर व्याजाचा वार्षिक दर 6.9 टक्केवर कायम ठेवला आहे. तर, एक ते पाच वर्षाच्या टर्म डिपॉझिटवर व्याजाचा दर 5.5-6.7 टक्क्याच्या दरम्यान कायम आहे. दुसरीकडे पाच वर्षाच्या रिकरिंग डिपॉझिटवर व्याजाचा दर 5.8 टक्केवर आहे.