बहुजननामा ऑनलाईन – आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनंतर आता आणखी एक जोडपे बॉलीवूडच्या पालकांच्या क्लबमध्ये सामील झाले आहे. ते जोडपे म्हणजे बिपाशा बसू (Bipasha Basu) आणि करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover). शनिवारी, 12 नोव्हेंबर रोजी हे दोघेही एका लहान परीचे पालक झाले. दरम्यान ही आनंदाची बातमी आल्यानंतर काही वेळातच बिपाशा (Bipasha Basu) आणि करणने त्यांच्या लहान परिचा (Bipasha Basu Baby Pirst Photo) पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. विशेष म्हणजे या फोटोमध्ये दोन हातांच्या वर दोन छोटे पाय दिसत आहेत. तसेच आता तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की या लहान परिच नेमक नाव काय ठेवल असेल ? तर मग वाचाच…
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बिपाशा आणि तिचा पती करण सिंग ग्रोवर यांनी या छोट्या परिचे नाव देवी बासू ग्रोवर (Devi Basu Grover) असे ठेवले आहे. खरतर बिपाशा ही पहिल्याच मुलाची आई असल्याने तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. दोघेही पालक म्हणून आनंदी आहेत. दरम्यान मंगळवारी म्हणजे आज बिपाशाला रुग्णालयातून डिस्चार्ज (Bipasha discharged from hospital) देण्यात आला आहे. दरम्यान यावेळी बिपाशाची मुलीला हातात घेतल्याची पहिली छायाचित्रे समोर आली…
पहा बिपाशाच्या मुलीची पहिली झलक
आज हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर बिपाशा आणि तिचा पती करण सिंग पापाराझींना हसतमुखाने पोज दिली आहे. फोटोंमध्ये बिपाशाने मुलगी देवी हिला आपल्या मांडीवर घेतले आहे. परंतु या छायाचित्रांमध्ये लहान मुलीचा चेहरा दिसत नाही. तसेच यावेळी बिपाशा आणि करण दोघेही ब्लॅक आउटफिटमध्ये दिसले. तसेच एकीकडे करण सिंग ग्रोव्हर सैल टी-शर्ट आणि पॅन्टमध्ये मस्त दिसत होता.तर त्याचवेळी लांब मॅक्सी ड्रेसमध्ये बिपाशा कमालीची दिसत होती. यासोबतच बिपाशाने शेड्स आणि मास्क घातला आहे. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये बिपाशा तिच्या छोट्या परिचे लाड करताना दिसली. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Bipasha Basu | bipasha basu discharged from hospital spotted with newborn baby and karan singh grover first photos
हे देखील वाचा :
Ajit Pawar | मुख्यमंत्री साहेब तुमच्या वाचाळवीरांना जरा आवरा – अजित पवार (VIDEO)
Pune Accident | पुण्यात दुर्दैवी घटना; ट्रॉलीच्या खाली येऊन गरोदर महिलेचा मृत्यू
Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार, चाकण परिसरातील घटना