बहुजननामा ऑनलाईन टीम : Bindi Controversy | सध्या सोशल मीडियावर टिकली हा चर्चेचा विषय ठरत आहे. महिलांनी टिकली लावावे की नाही लावावे हे सर्वस्वी त्यांच्या मनावर आहे. असे मत सोशल मीडियावर वाऱ्यासारखे फिरत आहे. त्यामागील कारण देखील तेवढेच मोठे आहे. शिवप्रतिष्ठान संघटनेचे (Shiv Pratishthan Sanghatan) अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्त्यव्यामुळे टिकली (Bindi Controversy) हा विषय चर्चेचा बनला आहे. संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकाराशी बोलण्यासाठी त्यांना आधी टिकली लाव मग तुझ्याशी बोलतो असे वक्तव्य केल्यामुळे सध्या टिकली वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर प्रत्येक जण आपले मत मांडत असून आता यात एका प्रसिद्ध अभिनेत्रीने देखील आपले मत मांडत पोस्ट शेअर करत आपले मत मांडले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अभिनेत्री राधिका देशपांडे (Radhika Deshpande) म्हणजेच ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या प्रसिद्ध मालिकेतील देविकाची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. देविका जरी आता आई कुठे काय करते या मालिकेत दिसत नसली तरी महत्त्वाच्या भागांमध्ये देविकाची कामगिरी हे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते. अगदी त्याचप्रमाणे आता इंस्टाग्रामवरील तिची पोस्ट देखील चाहत्यांना खूपच भावली आहे.
इंस्टाग्राम वर राधिकाने तिचा एक सुंदर असा टिकली (Bindi Controversy) लागलेला फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये ती असे म्हणते की, “बिंदू मात्र असलेली ही इवलीशी टिकली सध्या हेडलाईन्सच्या मध्यभागी आहे.
खरंतर ही ‘फोरहेड‘ म्हणजे कपाळाच्या मध्यभागी बघायला मिळते. अर्थातच स्त्रियांच्या! पण सध्या ती तिथून दिसेनाशी झाली आहे.
कधीतरी दिसते, कधी पुसट, अधून मधून दिसते पण काहींनी ती दिसेनाशी व्हावी म्हणजे इतिहास जमा व्हावी असं चित्र रंगवणं सुरू केलं आहे.”
आणि शेवटी जाता जाता ती हे पण बोलते, “खरंतर टिकली हा वादाचा, चर्चेचा विषय नसून लावण्याचा विषय आहे.
टिकली ज्याला आवडते तिने ती लावावी. लावायचा आग्रह असावा, हरकत नसावी, जबरदस्ती नसावी.
एवढे स्वातंत्र्य आपल्याला आहेच”. या तिच्या पोस्टवरून तिला आतापर्यंत खूप लाइक्स आणि कमेंट्स आले आहेत.
‘व्हेनिला स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट’ (Vanilla Strawberry and Chocolate Movie) या सिनेमात देखील राधिका ने उत्तम काम केले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Bindi Controversy | aai kuthe kay karte actress radhika deshpande share post about sambhaji bhide bindi controversy
हे देखील वाचा :
Pune Crime | ड्रेनेज साफ करताना दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, रांजणगाव MIDC मधील घटना
T20 World Cup | “…तर भारत उपांत्यफेरीत खेळण्याच्या लायक नाही; इरफान पठाणने व्यक्त केले रोखठोक मत
Chandrakant Khaire | काँग्रेस आमदारांबाबत केलेल्या विधानाबाबत चंद्रकांत खैरेंची दिलगिरी, म्हणाले…