बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं आज एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्याबाबत एएनआय वृत्तसंस्थेनं माहिती दिली आहे. लॉकडाऊन काळात प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील क्षेत्रास अनेक सूट देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून यापुर्वी वेळावेळी देण्यात आलेल्या मुभा, सूट ही कायम राहणार आहे. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊनचे नियम लागू असणार आहेत.
Maharashtra government extends #lockdown till February 28.
"Activities already allowed and permitted from time to time shall be continued and all earlier orders shall be aligned with this order and shall remain in force up to 28
February," reads statement.— ANI (@ANI) January 29, 2021
यापुर्वी राज्य सरकारनं काढलेल्या आदेशानुसारच प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सोयी-सुविधा या चालू राहणार आहेत. राज्यातील काही भागात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्याच पार्श्वभुमीवर राज्यातील लॉकडाऊन हा 28 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आला आहे. यापुर्वी वेळावेळी राज्य सरकारने काढलेले हे सर्व आदेश लागू राहणार असून प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व सुविधा (राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आलेल्या) या सुरूच राहणार आहेत.