भिवंडी : बहुजननामा ऑनलाईन – Bhiwandi Building Collapse | भिवंडीच्या वलपाडा परिसरातील एक 3 मजली इमारत कोसळली असून इमारतीच्या ढिगार्याखाली 40 रहिवासी अडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलिस अधिकारी व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मदतकार्य युध्दपातळीवर सुरू आहे. (Bhiwandi Building Collapse)
भिवंडीच्या कैलासनगर परिसरातील वलपाडा भागात वर्धमान कंपाऊंड नावाची 3 मजली इमारत होती. इमारतीच्या खालच्या बाजुला एक गोदाम अन् वरच्या 2 मजल्यावर नागरिक राहत होते. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानकपणे ही इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगार्याखाली 40 जण दबल्याची भिती व्यक्त करण्यात येत असून लोकांना ढिगार्याखालून बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. जखमींना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Bhiwandi Building Collapse | 3-storey building collapses in Bhiwandi, 40 feared buried under debris
हे देखील वाचा :