पुणे : बहुजननामा ऑनलाईन – भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीतील Bhaichand Hirachand Raisoni Scam (बीएचआर) आर्थिक गैरव्यवहार (Bhaichand Hirachand Raisoni Scam) प्रकरणातील ११ आरोपींनी त्यांनी घेतलेल्या मुदतठेवी (एफडी) पैकी ४० टक्के न्यायालयात जमा करावी, असा आदेश सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी बुधवारी (ता. १४) दिला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आरोपींनी जामीन झाल्यानंतर पुढील दहा दिवसांत २० टक्के आणि त्यानंतर १५ ऑक्टोंबरपर्यंत २० टक्के रक्कम न्यायालयात जमा करावी, या अटीवर त्यांना तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे. भागवत गणपत भंगाळे (जळगाव), छगन श्यामराव झाल्टे, जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री शैलेश मणियार(जळगाव), संजय भगवानदास तोतला (जळगाव), राजेश शांतिलाल लोढा (जामनेर), प्रीतिश चंपालाल जैन (धुळे), अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई) आणि प्रेम नारायण कोगटा (पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींना पुणे पोलिसांच्या (Pune Police) आर्थिक गुन्हे शाखेने (economic offences wing pune) सहा जिल्ह्यांत छापेमारी करीत अटक केली होती. आरोपींनी ३० ते ४० टक्के रक्कम देवून ठेवीदारांचे खाते नील केले. हे सर्व करीत असताना त्यांना खोटी माहिती देण्यात आली आहे. तसेच ठेवीदारांनी ठेवी द्याव्यात, अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती, असा युक्तिवाद करीत विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Special Public Prosecutor Praveen Chavan) यांनी आरोपींच्या जामिनाला विरोध केला. ठेवीदारांच्या वतीने ॲड. मनोज नायक (advocate manoj nayak) यांनी बाजू मांडली.
Web Titel : pune news bjp mahila morcha demands immediate disbursement of tired allowance to women domestic workers
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्र पूर्णपणे Unlock नाहीच