बीड : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना बीडमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. बीडमध्ये भाजपचे शहराध्यक्ष (Beed BJP City President) भगीरथ बियाणी (Bhagirath Biyani) यांनी स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या (Committed Suicide) केलेली. भगीरथ बियाणी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मिळालेल्या माहितीनुसार, भगीरथ बियाणी (Bhagirath Biyani) यांनी आपल्या राहत्या घरीच स्वत:ला गोळी (Shooting Himself) झाडत आत्महत्या केली. त्यांना लगेच शहरातील फिनिक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले.
बियाणी हे भाजपचे निष्ठावंत कार्य़कर्ते होते. सोमवारी रात्री आपल्या कुटूंबासमवेत रात्री उशिरापर्यंत त्यांनी गप्पा मारल्या. नंतर ते आपल्या खोलीत जावून झोपले. पहाटेच्या सुमारास उशिरापर्यंत दरवाजा उघडला नसल्याने कुटुंबाने पाहिले तर बियाणी हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना कुटुंबाने रुग्णालयात नेले मात्र त्यांना मृत घोषीत करण्यात आले. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेला आहे.
दरम्यान घटनेची माहिती समजताच खासदार प्रीतम मुंडे (MP Pritam Munde),
पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर (SP Nandkumar Thakur) यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते,
पदाधिकारी यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. रुग्णालयाबाहेर मोठा जमाव जमला होता.
आत्महत्ये मागचे कारण समजू शकले नसून पोलीस तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Bhagirath Biyani | beed shook bjp city president bhagirath biyani committed suicide by shooting himself
हे देखील वाचा :