बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना महामारीमुळे सध्या प्रत्येकजण सॅनिटायझरचा वापर करत आहे. अनेक लोक कारमध्ये सुद्धा सॅनिटायझरची बाटली ठेवतात. कारमध्ये बसताना आणि उतरताना लोक सॅनिटायझरचा वापर करतात. मात्र, सॅनिटायझरच्या वापरात जरा देखील चूक झाली तरी दुर्घटना घडू शकते. सॅनिटायझरमध्ये अल्कोहल असते, जो ज्वलनशील पदार्थ आहे. सॅनिटायझरने हाताचे किटाणू तर मरतात परंतु गरम वस्तूच्या संपर्कात आल्यास सॅनिटायझर पटकन पेट घेऊ शकते.
अशी घ्या काळजी
1- सॅनिटायझर वापरताना समोर कोणतीही गरम वस्तू नाही, याची खात्री करा. आगीच्या जवळ उभे राहून सॅनिटायझरचा वापर करू नका.
2- कारमध्ये सिगारेट ओढताना सॅनिटायझरचा वापर करू नका. सॅनिटायझरची बाटली मॅचिस किंवा लायटरसोबत ठेवू नका.
3- कारमध्ये सॅनिटायझर ठेवत असाल तर कारच्या तापमानाकडे लक्ष ठेवा. कारचे तापमान डिग्रीपेक्षा जास्त नसावे.
4- कारमध्ये सॅनिटायझर अशा ठिकाणी ठेवा जिथे उन्ह थेट सॅनिटायझरच्या बाटलीवर पडणार नाही.
5- कारमध्ये सॅनिटायझरची बाटली एखाद्या बॅगच्या आत ठेवा. कारमध्ये बसल्यानंतर सॅनिटायझरचा वापर टाळा.