पुणे : बहुजननामा ऑनलाईन – बसववादी सोशल फाउंडेशन (Basavwadi Social Foundation), पिंपरी चिंचवडतर्फे 4 नोव्हेंबर रविवारी सायंकाळी 6 वाजता सत्यशोधक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यात मुस्लिम समाज सुधारणा चळवळीचे अध्यक्ष पैगंबर शेख यांचे मानवी हक्क आणि महात्मा फुले याविषयावर व्याख्यान होईल. अशी माहिती फाउंडेशनतर्फे (Basavwadi Social Foundation) देण्यात आली.
रविवारी सायंकाळी 6 वाजता प्राधिकरण निगडी येथील ओझर्डे इन्स्टीट्यूट ऑफ रॅडिकल एज्युकेशन, कृष्णा सोसायटी हॉलमध्ये हे व्याख्यान होईल.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आनंदा कुदळे, राजकुमार माळी, संतोष फताटे, कपिल मोरे, प्रताप सोनवणे, संजय बनसोडे उपस्थित राहणार आहेत.
तरी नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष सिध्दरामेश नावदगेरे यांनी केले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Basavwadi Social Foundation | Satya Shodhak lecture series organized at Nigdi on Sunday
हे देखील वाचा :
Tiger 3 | टायगर 3 चित्रपटात ‘ही’ टीव्ही अभिनेत्री दिसणार महत्वाच्या भूमिकेत