मुंबई, बहुजननामा ऑनलाइन – नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबर रोजी सेलिब्रेट करून पार्टी करणाऱ्या सर्व मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात 24, 25 आणि 31 डिसेंबरला पहाटे 5 वाजेपर्यंत बार सुरू राहणार आहेत. तर वाइन शॉप रात्री 1 वाजेपर्यंत खुले राहणार आहेत. परवानाधारक दुकानातूनच मद्य विकत घ्यावे इतर कोणत्याही ठिकाणाहून घेऊन मद्यपान करू नहे तसेच आरोग्याला हानिकारक अशा निकृष्ट दर्जाचे मद्यपान करू नहे असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. दारूची दुकानं रात्री 11.30 पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर रात्री 1.30 पर्यंत परमिट रूम सुरू ठेवता येणार आहेत. नाताळ आणि नवीन वर्ष साजरं करण्यासाठी ही सवलत देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंत उत्पादन शुल्क विभागाने अनेक ठिकाणे छापे टाकून कारवाई केली. या कारवाईत 3 कोटी रुपयांहून अधिकचे बनावट मद्य जप्त करण्यात आले आहे. तसंच या प्रकरणी अनेकांना अटक करत कारखाने आणि गोदामंही सील करण्यात आली आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये ब्रँडेड मद्याच्या नावाने बनावट मद्य विकले जात असल्याचं प्रशासनाच्या नजरेस आलंय. हे बनावट मद्य आरोग्याला हानीकारक आणि मोठे आर्थिक नुकसान करणारे आहे, असं उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता वर्मा यांनी सांगितलं.
मुंबईत दारू साठ्यावर कारवाई
मुंबईत साकीनाका परिसरात उत्पादक शुल्काने केलेल्या कारवाईत 13 लाखांचा बनावट मद्याचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे बनावट स्टिकर आणि मोठ्या प्रमाणावर रिकाम्या बाटल्या देखील पोलिसांनी याब्यात घेतल्या आहेत. यासंबंधी पोलिसांनी राहुल परमार नावाच्या युवकाला अटक केली आहे.
पार्टी करणाऱ्यांसाठी महत्वाच्या सूचना
नाताळ आणि नव वर्ष साजरं करताना मद्य सेवन हे परमिट रूम किंवा घरी करावं.
कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करू नहे.
मुलांसमोर मद्य सेवन करू नका.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 5 हजारांचा दंड किंवा सहा महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.
अवैध ठिकाणी मद्य सेवन करताना आढळल्यास वरील दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
Visit : bahujannama.com