बहुजननामा : ऑनलाईन टीम – अमेरिकेतील अनेक दिग्गज व्यक्तींचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची धक्कादायक बाब घडली आहे.त्यामध्ये जो बिडेन,टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलोन मस्क, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि अॅपलच्या आणखी काही महत्त्वाच्या खात्यांचाही त्यात समावेश आहे. ट्विटर हँडल हॅक केल्यानंतर त्यावर एक खास मेसेज पोस्ट करण्यात आला होता.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचेही ट्विटर हँडल हॅक करण्यात आले आहे. संदेश क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याच्या उद्देशाने केले गेले असल्याचे संदेशांवरून दिसून आले आहे. हॅकरने अकाऊंटवर पोस्ट केलेल्या लिंकमध्ये बिट कॉईनच्या व्यवहारांची एक लिंकही टाकली होती.
तुम्ही आम्हाला 5 हजार बिट कॉईन्स देणार आहात,असे त्यामध्ये नमूद करण्यात आले होते. याची माहिती मिळाल्यानंतर वेबसाईटने ते डॉमेन रद्द केले आहे. अॅमेझॉनचे सह संस्थापक जेफ बेझोस आणि बिल गेट्स यांची ट्विटर खाती हॅक केल्यानंतर त्यावरही असेच संदेश लिहिण्यात आले होते. आम्ही तुम्हाला काही देऊ इच्छीतो. तुम्ही आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे. तुम्ही जेवढ्याही बिटकॉईन पाठवाल त्या दुप्पट करून आम्ही तुम्हाला परत पाठवू. हे केवळ 30 मिनिटांसाठीच आहे. असे अॅपलच्या अकाऊंटवरून लिहिण्यात आले होते.
कोरोनामुळे लोकांना मी बिटकॉईन दुप्पट करून देत आहे. हे सर्व सुरक्षित आहे, असे अॅलन मस्क यांच्या प्रोफाईलवरून लिहिण्यात आले होते. अमेरिकेतील राजकारणाशी निगडीत व्यक्तींचे ट्विटर हँडलही हॅक करून अशा प्रकारचे संदेश लिहिण्यात आले होते. यामध्ये ओबामा आणि जो बिडन यांचंही नाव सामिल आहे. या घटनेनंतर ट्विटरच्या सुरक्षेच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, यानंतर काही वेळाने ट्विटरने एक ट्विट करत या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती दिली आहे.