नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर घरात लग्नकार्य असेल किंवा काही अशी वस्तू खरेदी करायची आहे, ज्यासाठी आपल्याला जास्त पैशांची आवश्यकता आहे तर तुम्ही पर्सनल लोनचा आधार घेऊ शकता. इतकेच नव्हे तर घर रिनोवेट करण्यासाठी तुम्ही पर्सनल लोन घेऊ शकता. याचे कारण हे आहे की, होमलोनमध्ये अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते. या तुलनेत पर्सनल लोनमध्ये बँक जास्त कागदपत्रांची मागणी करत नाही. पर्सनल लोन एकप्रकारचे अनसीक्युअर्ड लोन असते. यासाठी बँक किंवा लेंडरला कोणत्याही प्रकारच्या कोलेट्रल किंवा सिक्युरिटीची आवश्यकता नसते.
लवकर मिळते अप्रुव्हल
जर तुम्ही होमलोन किंवा गोल्डलोन घेतले असेल तर तुम्हाला माहित असेल की त्याची प्रक्रिया किती वेळखाऊ असते. या उलट पर्सनल लोन घेताना केवायसी आणि उत्पन्नाशी संबंधीत कागदपत्र द्यावे लागतात. यानंतर सर्वप्रकारचे व्हेरिफिकेशन आणि इतर काम तीन ते पाच कामकाजाच्या दिवसांत तुम्हाला लोनच्या अप्रुव्हलचा मॅसेज येऊ शकतो. या प्रकियेच्या दरम्यान बँक किंवा लेंडर तुमच्या सिबिल स्कोअरसह लोन फेडण्याची तुमची क्षमता ठरवतात. लोन मंजूर झाल्यानंतर तुम्ही काही तासांच्या आत पूर्ण रक्कम अकाऊंटवर मिळते.
एक ते पाच वर्षांचा कालावधी
पर्सनल लोनचे पैसे सोप्या मासिक हप्त्यात म्हणजे ईएमआयद्वारे भरावे लागतात. सामान्यतः पर्सनल लोन भरण्यासाठी एक ते पाच वर्षांचा कालावधी मिळतो. म्हणजे 12 ते 60 ईएमआय पर्यंत कर्जाची परतफेड करावी लागते.
पर्सनल लोनसाठी असे करू शकता अप्लाय
जर तुम्ही पर्सनल लोन घेण्याचे पक्के केले असेल तर आता तुम्हाला हे ठरवावे लागेल की, तुम्हाला किती पैशांची आवश्यकता आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेची वेबसाइट चेक करावी लागेल की, किती रक्कमेपर्यंतच्या लोनसाठी तुम्ही एलिजिबल आहात. याशिवाय तुम्ही सभाव्य ईएमआयसुद्धा कॅलक्युलेट करू शकता. याशिवाय, खुप पोर्टल आहेत, जिथे तुम्ही आपल्या पॅनकार्डची काही माहिती टाकून हे पाहू शकता की, तुम्हाला कोणती बँक किंवा लेंडर किती लोन देऊ शकतात. तसेच तुम्ही विविध बँकांकडून ऑफर करण्यात येणार्या संभाव्य व्याजदर सुद्धा पाहू शकता. यानंतर तुम्ही ऑनलाइन बॅकिंग, नेट बँकिंग किंवा पुन्हा बँकेत जाऊन लोनसाठी अप्लाय करू शकता.
या कागदपत्रांची आवश्यकता
पर्सनल लोन घेण्यासाठी उत्पन्नाचा पुरावा म्हणून सॅलरी स्टेटमेंट, इन्कम टॅक्स रिटर्न आणि बँक अकाऊंटचे स्टेटमेंट द्यावे लागेल. याशिवाय ओळखपत्र आणि पत्त्याच्या पुराव्याशी संबंधित कागदपत्र आणि पॅनकार्ड द्यावे लागेल. जर तुम्ही सेल्फ-इम्प्लॉईड असाल तर तुम्हाला डिग्री आणि लायसन्सची प्रत द्यावी लागेल.