बहुजननामा ऑनलाईन – एप्रिल महिन्यात देशातील बँका तब्बल 15 दिवस बंद राहणार आहेत. एप्रिलमध्ये विविध सुट्ट्यांमुळे 9 दिवस आणि महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बँका बंद असतात या सर्व सुट्ट्या पकडून एप्रिल महिन्यात तब्बल 15 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. त्यामुळे तुमचे बॅंकेचे कोणते काम अडकून पडले असेल तर आधीच करून घ्या, नाहीतर तुम्हाला समस्यांच्या सामना करावा लागेल.
दरम्यान, सुट्टीमध्ये बँका बंद राहणार असल्यातरी मोबाइल आणि इंटरनेट बँकिंग सुविधा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. ग्राहकांना ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून आपली कामे करता येणार आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, एप्रिल महिन्यात गुड फ्रायडे, राम नवमी, बिहू, बाबू जगजीवन राम यांचा जन्मदिन, तामिळ नववर्ष आणि इतर काही सणांचा समावेश आहे. या दिवशी बॅंकाना सुट्टी राहणार आहे. 1 आणि 2 एप्रिल रोजी बँकांमध्ये काम होणार नाही. 31 मार्च रोजी बँकांना सुट्टी नाही. मात्र आर्थिक वर्ष संपत असल्याने इयर एडिंगच्या कामांसाठी बँकेचे दैनंदिन कामकाज बंद राहणार आहे
एप्रिलमध्ये बॅंकाना असलेल्या सुट्टया
1 एप्रिल- आर्थिक वर्ष संपत असल्याने दैनंदिन कामकाज होणार नाही.
2 एप्रिल – गुड फ्रायडेची सुट्टी
5 एप्रिल- बाबू जगजीवन राम यांच्या जन्मदिनाच्या पार्श्वभूमीवर हैदराबादमध्ये बँका बंद राहतील.
6 एप्रिल- तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठीचा मतदानाचा दिवस आहे. त्यामुळे चेन्नईतील खासगी आणि सरकारी बँकांमध्ये कामकाज होणार नाही.
13 एप्रिल- गुडी पाडवा, तेलगू नववर्ष, उगाडी पर्व, साजिबू नोंगमापनबा (चीरोबा) बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इम्फाळ, जम्मू-कश्मीर, मुंबई, नागपुर, पणजी आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.
14 एप्रिल- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती
15 एप्रिल- हिमाचल दिवस, बंगाली न्यू ईयर डे, बोहाग बिहू, सरहुलच्या पार्श्वबूमीवर अगरताळा, गुवाहटी, कोलकाता, रांची आणि शिमलामध्ये बँका बंद राहतील.
16 एप्रिल- बोहाग बिहूच्या निमित्ताने गुवाहटीमध्ये बँका बंद राहणार आहेत.
21 एप्रिल- राम नवमीची सुट्टी
तसेच रविवार सोबतच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांची सुटी असते. त्यामुळे 4, 11, 18 आणि 25 एप्रिल रोजी रविवारच्या सुट्टीनिमित्त बॅंका बंद राहतील. तर 10 एप्रिल आणि 24 एप्रिल रोजी अनुक्रमे दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने या दिवशी बॅंकाना सुट्टी असणार आहे.