पुणे : – Balewadi Pune Crime News | प्रेयसीला बार मध्ये नेल्याच्या कारणावरून प्रियकराने तिच्या मैत्रिणीला मारहाण केली. तसेच तिच्यासोबत अश्लील वर्तन (Obscene Behavior) करुन विनयभंग केला (Molestation Case). याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.8) रात्री साडे अकराच्या सुमारास बालेवाडी येथे घडला आहे.
याबाबत 21 वर्षीय तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन शांतनु घरे (वय-23 रा. रुगवेद अपटाऊन, बालेवाडी, पुणे) याच्यावर आयपीसी 354अ, 323 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांच्या वर्ग मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आहे. फिर्यादी व त्यांची मैत्रिण बारमध्ये गेल्या होत्या. प्रियसी बारमध्ये गेल्याचे शांतनु याला आवडले नसल्याने त्याने फिर्यादीसोबत वाद घातला.
शांतनु याने फिर्यादीकडे असणारी चावी फिर्यादीच्या ट्राऊजरच्या पॉकेटमधून काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला विरोध केला. यावरून त्यांच्यात वाद सुरु झाला. शांतनु याने फिर्यादी यांना धक्का मारुन थांबवण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये सुरु असलेला वाद सोडवण्यासाठी फिर्यादी यांची मैत्रिणीने मध्यस्थी केली. त्यावेळी आरोपी शांतनु याने फिर्यादी यांना अश्लील स्पर्श करुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जयश्री पाटील (PSI Jayshree Patil) करीत आहेत.