बहुजननामा ऑनलाईन टीम : Ayan Mukerji | नुकताच प्रदर्शित झालेला ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमात अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे मुख्य भूमिकेत झळकले होते. यामध्ये रणबीर कपूरने शिवची भूमिका साकारली तर आलियाने ईशाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. हा चित्रपट प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस पडला होता. आता प्रेक्षकांना या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रतिक्षा आहे. एका मुलाखतीत अयान मुखर्जीने (Ayan Mukerji) ब्राह्मस्त्र 2′ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ब्रह्मस्त्र या चित्रपटाचे दिग्दर्शन आर्यन मुखर्जी यांनी केले होते. आता ब्रह्मास्त्र 2 बाबत त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. एका मुलाखतीमध्ये मुखर्जी म्हणाले “ब्रह्मास्त्र 2 या सिनेमावर आमचे काम सुरू आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग खूपच रंजक असणार आहे. ब्रह्मास्त्र सिनेमाचा दुसरा भाग रिलीज करायला आम्ही दहा वर्षे लावणार नाही कारण दहा वर्षांनी हा सिनेमा पहायला कोणीच येणार नाही. तर येत्या दोन वर्षात ब्रह्मास्त्र 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत कोण असणार याबाबत अद्याप तरी आम्ही कोणाची निवड केलेली नाही. रणवीर सिंह पासून यशपर्यंत अनेकांची नावे देवच्या भूमिकेसाठी घेतली जात आहेत, मात्र अजून तरी आमचे काही ठरलेले नाही. यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. या सिनेमाचा दुसरा भाग खूपच रंजक असणार एवढे मात्र नक्की”. (Ayan Mukerji)
2022 मधील ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये ब्रह्मास्त्र या चित्रपटाचा देखील समावेश होता. या चित्रपटाने कार्तिक आर्यनच्या
‘भूल भुलैया 2’ या सिनेमाला देखील मागे टाकले होते.
अयान मुखर्जी जवळपास ११ वर्ष ब्रह्मास्त्र या चित्रपटावर काम करत होते.
सिनेमाची कथा लिहिण्यापासून ते प्रत्यक्षात आणण्यापर्यंत त्यांना 11 वर्ष लागल्याने ब्रह्मास्त्र 2 ला किती वर्ष लागतील असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आला होता. मात्र आता येत्या दोन वर्षात प्रेक्षकांना ब्रह्मास्त्र 2 हा चित्रपट पहायला मिळणार आहे. त्यामुळे 2025 मध्ये ‘ब्रह्मास्त्र 2’ रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Ayan Mukerji | ayan mukerji brahmastra part two dev shares an update entertainment
हे देखील वाचा :
Sangli Crime News | सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी एका सहकारी संस्थेच्या संचालकासह सचिवावर गुन्हा दाखल