पुणे : पोलिसांविरुद्ध तक्रार केल्याच्या कारणावरुन भाजपाच्या नगरसेविकेच्या अंगावर फारच्युनर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार भक्तीशक्ती चौकात शुक्रवारी दुपारी दीड वाजता घडला असून निगडी पोलिसांनी फॉर्च्युनर गाडीचालक व अशोक काळे (वय ५७, रा़ कृष्णानगर, चिंचवड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका ४७ वर्षाच्या नगरसेविकेने फिर्याद दिली आहे. या नगरसेविका आपल्या पतीसमवेत मुलीला भेटण्यासाठी चिंचवड येथील घरातून कारने निघाले होते. भक्तीशक्ती चौकात ते युटर्न घेत असताना फॉर्म्च्युन गाडीतील आरोपीने त्यांच्या गाडीला कट मारुन वाहन आडवे लावले. गाडीतून खाली उतरण्यासाठी लावून चालकाने त्यांचा विनयभंग करुन ‘ये तुने मेरे मालिक के खिलाफ क्यो पोलीस तक्रार किया’ असे म्हणून त्यांच्या कानाखाली मारुन हाताने अश्लील घाणरडे वर्तन केले. काळे याने ‘ये गाडी डाल उसके उपर’ असे म्हणून ‘ठोक उसकी’ असे म्हणून चालकाने फॉरर्च्युनर गाडी त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.