लासलगाव : बहुजननामा ऑनलाइन – मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय रेल्वे कार्यालयातर्फे प्रवासी आणि उपभोक्ता यांच्या हितासाठी नियुक्त केलेल्या सल्लागार समितीच्या सदस्यपदी राजेंद्र चाफेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.रेल्वे प्रवासी व सेवा उपभोक्ता यांच्यामधील दुवा म्हणून या सदस्यास पुढील दोन वर्षासाठी रेल्वे मंडळ मुंबई या कार्यक्षेत्रामध्ये मध्य रेल्वे सल्लागार समितीत काम करण्यासाठी यांची नियुक्ती झाली आहे.
रेल्वेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवा आणि सुविधा यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी वेळोवेळी होणाऱ्या बैठकीमध्ये आपली मते नोंदवतील यासाठी या सल्लागार समितीची निर्मिती करण्यात आलेली आहे.सदरची नियुक्तीचे पत्र बी अरुणकुमार वाणिज्य प्रबंधक भुसावळ यांनी दिले आहे. चाफेकर यांच्या या निवडीसाठी खा.भारती पवार, जिल्हा परिषद सदस्य डि.के. जगताप, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप,भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश दायमा, जिल्हा अध्यक्ष केदा आहेर, आमदार राहुल आहेर यांनी विशेष प्रयत्न केले.