बहुजननामा ऑनलाइन टीम – शिक्षणविवेक’ व ‘टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिक्षण माझा वसा’ या ‘राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार 2021’ दरवर्षी देण्यात येतो. जानेवारी 2021 मध्ये होणाऱ्या या राज्यस्तरीय पुरस्कार(Shikshan Mazha Vasa) वितरणासाठी महाराष्ट्रातील केवळ पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या शाळांतील शिक्षकांची ज्ञानरचनावादावर आधारित नाविन्यपूर्ण उपक्रमांची नामांकने मागवण्यात येत आहेत.
यामध्ये 5 अध्यापन विषय आहेत –
1. भाषा :- मराठी/हिंदी/इंग्रजी, 2. गणित, 3. विज्ञान, 4. कला : चित्र/नाटय/शिल्प/संगीत आणि 5. तंत्रज्ञान एक उपक्रमशील मुख्याध्यापक व एक विशेष पुरस्कार अशा सात पुरस्कारार्थींची निवड केली जाणार आहे.
पुरस्काराचे स्वरूप :
5000 रोख रक्कम, सन्मानचिन्ह व मानपत्र
नामांकनासाठीचे निकष व नियम:
– नामांकन पाठवणाऱ्या शिक्षकाचे कमाल वय 45 वर्षे असावे. (दि. 30 नोव्हेंबर, 2020 पर्यंत)
– जन्मदाखला पुरावा आवश्यक आहे. (उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कारासाठी वयाची अट नाही.)
– किमान 5 वर्षे एका उपक्रमाची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध झालेली असावी.
– नामांकन पाठवण्याची अंतिम दिनांक : 30 डिसेंबर 2020
– निवड समितीचा निर्णय अंतिम असेल.
नामांकन पाठवण्याचे स्वरूप
आपल्या उपक्रमाची माहिती पुढील मुद्यांच्या आधारे पाठवावी.
शिक्षकाचे नाव, शाळेचे नाव व पत्ता, उपक्रमाचे नाव, उपक्रमाची गरज, उपक्रमाची कार्यपद्धती व अंमलबजावणी, उपक्रमात आलेल्या अडचणींवर केलेल्या उपाययोजना, निष्कर्ष, पुढील नियोजन, उपक्रमासंबंधीची छायाचित्रे.
माहिती पाठवण्याचा पत्ता
‘शिक्षणविवेक’, म.ए.सो. भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30 या पत्त्यावर कुरिअरद्वारे किंवा mazavasa2020@gmail.com या मेल आयडीवर पाठवावी. किंवा https://forms.gle/