पुणे : बहुजननामा ऑनलाइन – कोरेगाव भीमा हिंसाचार आणि अर्बन नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे याला शनिवारी सकाळी पुणे पोलिसांकडून मुंबईत अटक करण्यात आली आहे. पुण्यातील सत्र न्यायालयाने शुक्रवारी त्याचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पुणे पोलिसांनी त्याला अटक केली. मुंबई विमानतळावर उतरताच पुणे पोलिसांकडून तेलतुंबडेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तसेच पुणे पोलीस तेलतुंबडेला पुण्याला घेऊन येत असून त्यांना न्यायालयात हजर करून त्याच्या कोठडीची मागणी करणार आहेत.
आनंद तेलतुंबडे यांना अटक होण्याची शक्यता
आज न्यायालयात करणार हजर
पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी कारवाई केली होती. मात्र ‘मी कोणत्याही बेकायदा कार्यवाहीत सहभागी झालेलो नाही आणि कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराशी माझा काहीही संबंध नाही’, असा दावा करत आनंद तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्यांच्यावरील एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.