यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ‘राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. लोकांनी काळजी न घेतल्यास पुढच्या दीड-दोन महिन्यांमध्ये संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या-त्या वेळी रुग्णसंख्येचा आकडा पाहून कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्याबाबतचे निर्णय मुख्यमंत्री घेतील,’ असं देखील अजित पवार यांनी सांगितलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध (Restrictions) लागू होणार का यासंदर्भात चर्चा सुरु झाली आहे. यामुळे अजित पवार यांनी निर्बंधाबाबत माहिती दिली. दरम्यान, तत्पुर्वी काही दिवसापुर्वी राज्यात रात्रीची जमावबंदी राज्य सरकारने (Maharashtra Government) लागू केली आहे.
Web Title :- Ajit Pawar | ncp leader and deputy cm ajit pawar talks about increased corona patients and restrictions may imposed state