अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – अहमदनगरमध्ये (Ahmednagar Crime) माणुसकीच्या काळिमा फासणारी घटना घडली आहे. अनाथालयातील एका तरुणीवर काही तरुणांनी बलात्कार (Rape) केला. रागाच्या भरात अनाथालयातून निघून गेलेल्या या तरुणीला जेवणाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार (Ahmednagar Crime) केला आहे. या घटनेला उघडकीस यायला बरेच महिने लोटून गेले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Ahmednagar MIDC Police Station) अत्याचारात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता आरोपींना शोधण्याचे आणि पुरावे संकलित करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. या घटनेनंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर या प्रसंगाच्या धक्क्यातून बाहेर आल्यानंतर तिने तिच्यावर झालेल्या बलात्काराची (Gang Rape) माहिती दिली. त्यानंतर अनाथालयाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
नगरच्या एका अनाथालयात राहणारी ही तरुणी रागाच्या भरात १४ जुलै २०२२ रोजी अनाथायल सोडून निघून गेली. त्यानंतर ती शिर्डीत मंदिराच्या परिसरात एकटीच राहत होती. दिवाळीच्या आधी काही दिवस आधी रात्रीच्यावेळी काही तरुण तिच्याजवळ आले. तुला पोटभर जेवण देतो, असे सांगून ते तिला घेऊन गेले. तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिचे हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबला. त्यानंतर पाच जणांनी तिच्यावर अत्याचार (Ahmednagar Crime) केला.
अनेक दिवस ही तरुण तिची शुद्ध हरपून बसली होती. दरम्यानच्या काळात ती गरोदर असल्याचे रुग्णालयाच्या
लक्ष्यात आले. ती शुद्धीवर आल्यानंतर अनाथालयच्या मदतीने पोलिसांमध्ये ५ अनोळखी आरोपींच्या विरोधात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Ahmednagar Crime | orphan girl gang raped in shirdi by baiting her with food ahmednagar Gang Rape news
हे देखील वाचा :
Pune Pimpri Crime | भोसरीत टोळक्याकडून दुकानांची तोडफोड, एकाला अटक
Mithila Palkar | मिथिला पालकर तिच्या ड्रेसमुळे चर्चेत; नेटकऱ्यांनी पायपुसणी म्हणत केले ट्रोल
MSRTC | एसटी महामंडळाने पगारी रजांसंदर्भात घेतला मोठा निर्णय