शिर्डी : बहुजननामा ऑनलाईन – Ahmednagar Crime News | शिर्डीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीहून शिर्डीला सहलीसाठी आलेल्या 82 विद्यार्थ्यांसह 6 शिक्षकांना विषबाधा झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील आदर्श हायस्कूलमधील हे विद्यार्थी आहेत. दोन दिवसांपूर्वी ते सहलीसाठी निघाले होते. शिर्डीमध्ये येण्यापूर्वी त्यांनी शेवगावजवळ दुपारचे जेवण केले आणि त्यानंतर शिर्डीत दाखल झाल्यानंतर त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर रात्री देवगड या ठिकाणी मुक्काला जात असताना विद्यार्थी आणि काही शिक्षकांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले. (Ahmednagar Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यानंतर विद्यार्थांना अधिक त्रास जाणवत असल्यानं शिक्षकांनी सर्व मुलांना रात्री शिर्डीच्या साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यामधील काही विद्यार्थ्यांना ताप आल्याने रुग्णालयाने खबरदारी म्हणून देखरेखीखाली ठेवलं आहे. विशेष म्हणजे या मुलांनी बाहेर कुठे काहीच खाल्ले नसल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे. जेवण तयार करण्याची सामुग्रीही सोबतच असल्याचं शिक्षकांनी सांगितले आहे. तर पाणी बदलामुळे उलट्या आणि जुलाब सुरू झाले असावेत, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. (Ahmednagar Crime News)
अमरावतीहून सहलीसाठी एकूण 227 विद्यार्थी आले असून यातील 82 विद्यार्थ्यांना हा त्रास झाला आहे.
सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून साईनाथ रुग्णालयाचे सर्व डॉक्टर आणि स्टाफ विद्यार्थ्यांची काळजी घेत आहेत.
परिस्थितीनुसार सायंकाळ विद्यार्थी आणि शिक्षकांना डिस्चार्ज देण्यात असे साईनाथ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
विद्यार्थ्यांना हा त्रास नेमका कशामुळे झाला, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
Web Title :- Ahmednagar Crime News | students who came to shirdi for a trip got food poisoning 82 students along with teachers were admitted to the hospital
हे देखील वाचा :
Hingoli Accident News | धक्कादायक! कुटुंबाच्या भेटीसाठी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू
Nagpur ACB Trap | 1 लाखाची लाच घेताना स्थापत्य अभियंत्यासह तीनजण अँन्टी करप्शनच्या जाळ्यात