अहमदाबाद : बहुजननामा ऑनलाईन – मागील वर्षी जेव्हा कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात हाहाकार माजला होता आणि लोक आपल्या घरांमध्ये लपून बसले होते, तेव्हा केवळ फ्रंटलाईन वर्करच होते जे आपले कर्तव्य संपूर्ण निष्ठेने करत होते. यासाठी केंद्र सरकारने फ्रंटलाईन वर्करचे शौर्य पाहून त्यांच्या सन्मानासाठी पुष्पवृष्टी सुद्धा केली होती, परंतु आता एक फ्रंटलाइन वर्कर जी एक नर्स आहे जिने एप्रिल 2020 मध्ये तिच्या झालेल्या छळाची माहिती पोलिसांना दिली आहे. नर्सने सांगितले की, कशाप्रकारे कोरोना झाल्यानंतर पती आणि सासरच्यांनी तिला घराबाहेर काढले आणि घरात येण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली, ज्यानंतर नर्स आपल्या माहेरात राहत होती.
काय आहे संपूर्ण प्रकरण :
अहमदाबादच्या इसनपुर परिसरात राहणार्या 27 वर्षांच्या नर्सने खोखरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. नर्सने तक्रारीत म्हटले आहे की, तिचा विवाह फेब्रुवारी 2020 ला खोखरामध्ये राहणार्या एका व्यक्तीशी झाला होता. ती मणिनगरच्या एल.जी. हॉस्पीटलमध्ये नर्स आहे, परंतु तिचे काम तिच्या सासरच्यांना पसंत नव्हते, यासाठी विवाहानंतर ते तिचा छळ करत होते. तर एप्रिल 2020 मध्ये जेव्हा नर्सला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला तेव्हा पतीसह सासरच्या सर्व सदस्यांनी तिला घरात येऊ दिले नाही. एवढेच नव्हे, महिलेला घरात येण्याच्या बदल्यात 10 लाख रुपये देण्याची सुद्धा मागणी केली आणि पैसे न दिल्यास घटस्फोट देण्यास सांगितले.
नर्सने पतीविरोधात दाखल केली तक्रार :
नर्सच्या माहेरच्यांनी हस्तक्षेप करूनही जेव्हा प्रकरण मिटले नाही तेव्हा महिलेने पोलिसांना हकीकत सांगितली आणि पतीसह सासरच्या सदस्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे, सोबत हे सुद्धा सांगितले की, ती 6 महिन्यापासून ती आपल्या माहेरात रहात आहे आणि तिचा पती तिला भेटायलाही आला नाही.