मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेली स्फाेटक कार, त्यानंतर मनसुख हिरेन यांचे कथित आत्महत्याप्रकरण आदी कारणांमुळे मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करत परमबीर सिंह यांची गुहा रक्षक दलाच्या महासमादेशक पदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, परमबीर सिंह यांनी महासमादेशक पदाची सूत्रे न स्वीकरताच रजेवर गेले आहेत. त्यांच्याकडून अचानक पदभार काढून घेण्यात आल्याने परमबीर सिंह नाराज झाले असून ते स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या पवित्र्यात असल्याचे समजते.
परमबीर सिंह हे गेल्या १३ महिन्यांपासून मुंबई आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळत हाेते. अंबानी यांच्या निवासस्थानाजळव सापडलेली स्फाेटक कार, त्यानंतर मनसुख हिरेन यांचे कथित आत्महत्याप्रकरण यावरुन उठला आहे. या प्रकरणांमध्ये पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा असणारा सहभाग तसेच एनआयएकडून सुरु असलेल्या तपासात समोर येणाऱ्या अडचणीमुळे परमबीर सिंह यांच्यावर आरोप करण्यात येत होते. विरोधकांनी त्यांच्यवर टीका केली होती.
दरम्यान प्रकरणे हाताळण्यात अपयश आल्याने परमबीर सिंह यांची आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आली. दरम्यान एनआयए सिंह यांच्याकडे चौकशी करणार असल्याने त्यांची बुधवारी तडकाफडकी बदली केल्याचे सूत्रांनी सांगितले.
रजनीश सेठ यांनी घेतली डीजीपीची सूत्रे
एसीबीचे प्रमुख रजनीश सेठ यांनी गुरुवारी सकाळी पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभारची सूत्रे घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यालयातील सर्व विभागांच्या प्रमुखांची बैठक घेतली, तसेच प्रलंबित कामांचा आढावा घेतला.